घरमुंबईआता फुलेही महाग, उत्सव काळात फटका

आता फुलेही महाग, उत्सव काळात फटका

Subscribe

आषाढी एकादशीनंतर राज्यभरात उत्सवांचे पडघम वाजू लागतात. सण आणि उत्सव हे पूजेशिवाय पूर्णच होत नाहीत आणि पूजेसाठी फुले लागतातच. फुले का महाग झाली या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हि बातमी संपूर्ण वाचा...

आषाढी एकादशीनंतर राज्यभरात उत्सवांचे पडघम वाजू लागतात. सण आणि उत्सव हे पूजेशिवाय पूर्णच होत नाहीत आणि पूजेसाठी फुले लागतातच. त्यामुळे या उत्सवांच्या काळात फुलांना मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये प्रचंड मागणी असते. त्यातच नुकतेच वसई येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची नासाडी झाल्याची माहिती फुलांच्या व्यापार्‍यांकडून देण्यात आली. त्यामुळे येत्या काळात उत्सवाच्या तोंडावर फुलेदेखील महाग होण्याची शक्यता आहे.

उत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यातून फुलांना प्रचंड मागणी असते. त्यातच यंदाच्यावर्षी आधीच प्लास्टिक आणि थर्माकॉलवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उत्सवांच्यावेळी लोक सजावटीसाठी पर्याय म्हणून फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची शक्यता आहे. आधीच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत, त्यातच आता आगामी काळात पूजेसाठी फुलेदेखील महाग होणार आहेत.

- Advertisement -

बाजारात सध्या तरी फुलांचा व्यवस्थित पुरवठा असल्याची माहिती काही व्यापार्‍यांकडून देण्यात आली. मात्र राज्यभर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यात फुलांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात फुलांची आवक घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे फुले महाग होण्याची शक्यता आहे. येत्या काळात फुलांचे भाव जरी वाढले तरी फुल विक्रेत्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, असे वाटत नाही. कारण सण उत्सवासाठी फुलांची गरज असल्यामुळे लोक ती विकत घेतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे.

उत्सवाचे दिवस सुरू झाले आहेत. आधीच इतर वस्तू महाग आहेत. त्यात आता पूजेसाठी लागणारी फुले महाग झाली तर खर्चाचा नवा बोजा पडेल. देवा आता तरी या महागाईपासून वाचव रे.
– कोकिळा लकूम, ग्राहक

- Advertisement -

मुंबईच्या मार्केटमध्ये वसईहून फुलं यायची. मात्र यंदाच्या वर्षी वसई -विरार भागात मुसळधार पावसामुळे फुलांची नासाडी झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत फुले महाग होण्याची शक्यता आहे.
दत्ता राऊत, फुल विक्रेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -