घरमुंबईरेल्वेनं विनातिकीट प्रवास पडणार महागात

रेल्वेनं विनातिकीट प्रवास पडणार महागात

Subscribe

रेल्वेमधून विनातिकीट प्रवास केल्यानंतर पकडलं गेल्यास, १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी हा उपाय करण्यात येण्याची शक्यता आहे.

आता ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करणं चांगलंच महागात पडणार आहे. होय हे खरं आहे. आता रेल्वेमधून विनातिकीट प्रवास केल्यानंतर पकडलं गेल्यास, १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी हा उपाय करण्यात येण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी दंडाची किंमत ही चारपट करण्याची मागणी करणारा प्रस्ताव केला आहे.

सध्या आकारण्यात येतो २५० रुपये दंड

आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना केवळ २५० रुपये दंड आकारण्यात येत आहे. पण आता हा दंड १००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेनं दिल्ली रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव पाठवला असून मागच्या आठवड्यात रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान दाखवण्यात आला होता. या प्रस्तावावर विचार करण्याचं आश्वासन रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलं आहे.

- Advertisement -

विनातिकीट प्रवास करणारे ३.९४ लाख प्रवासी

एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणारे ३.९४ लाख प्रवासी पकडून त्यांना दंड केला. यामध्ये लगेज घेऊन जाणाऱ्या प्रवाशांचादेखील समावेश आहे. या प्रवाशांकडून रेल्वेन १५.३४ कोटी रुपये दंड वसूल केला असून २०१७ एप्रिलमध्ये वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या तुलनेत २६ टक्के हा दंड जास्त होता. दंड वाढवल्यास, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होईल अशी रेल्वेला अपेक्षा आहे. यापूर्वी हा दंड ५० रुपये आकारण्यात येत होता. २००२ साली तो दंड २५० रूपये करण्यात आला. बरेच लोक या विचाराने तिकीट काढत नाहीत की, मासिक पासाचे पैसे देण्यापेक्षा पकडल्यानंतर २५० रुपये भरणे जास्त सोपं आहे. त्यामुळं मध्य रेल्वेत रोज साधारण ३ हजार तर पश्चिम रेल्वेवर साधारण १३०० प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात येतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -