Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona: हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेले ४ जण पळाले

Corona: हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेले ४ जण पळाले

Related Story

- Advertisement -

परदेशातून परतलेल्या चार व्यक्तींना सांताक्रूझ येथील हॉटेल साई इनमध्ये क्वारंटाईन करून ठेवले असताना त्यांनी सेटिंग लावून त्या हॉटेलमधून पळ काढल्याची खळबळजनक घटना महापौर किशोरी पेडणेकर यांनी उघडकीस आणली आहे.
या गंभीर घटनेमुळे मुंबई कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता खुद्द महापौरांनीच वर्तवली आहे. या घटनेची चौकशी करून जबाबदार हॉटेल व्यवस्थापन आदींवर कारवाई करावी, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

विदेशातून मुंबईत आलेले चारजण सांताक्रूझ (पूर्व) येथील हॉटेल साई इनमध्ये क्वारंटाईन होते. मात्र या चार जणांनी काहीतरी सेटिंग करून या हॉटेलमधून पळ काढल्याची खबर महापौर पेडणेकर यांना मिळाली. त्यामुळे महापौर धास्तावल्या. कारण की, या चारजणांना अथवा त्यांच्यापैकी कोणाला कोरोनाची लागण झाली असेल आणि ते इतरांच्या संपर्कात आल्यास त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर, उप महापौर सुहास वाडकर यांनी तात्काळ या हॉटेलमध्ये अचानक भेट देऊन तेथे पाहणी केली. हॉटेलमधून पळ काढलेल्या चारजणांचा कसून शोध घ्यावा आणि त्यांना पकडून त्वरित क्वारंटाईन करावे. तसेच हॉटेल मालकावर आणि संबंधित प्रवाश्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस व पालिका प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सांताक्रूझ येथील हॉटेल साई इन मधून चारजण पळून गेल्याचे निर्दशनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाची स्थिती भयंकर असून त्यानंतरही प्रवासी अशाप्रकारे वागून हॉटेल मालक त्यांना सहकार्य करत असेल तर ही चिंतनीय बाब आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना अवगत करून संबंधित सर्व हॉटेल मालकांना सक्त ताकीद देण्याचे निर्देश देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाश्यांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर या प्रवाश्यांची संपूर्ण जबाबदारी ही हॉटेल मालकावर असते. घडलेल्या प्रकाराबाबत हॉटेल मालकाने संबंधित पोलीस स्टेशन आणि महापालिकेला कळविणे गरजेचे होते, परंतु त्यांनी कुणालाही कळविले नाही, असे महापौर यावेळी म्हणाल्या. पळून गेलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांपासून इतर जण बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नसून या प्रकारचे धाडस कोणीही करू नये, यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – Corona Update: मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने; कोरोनाबाधितांच्या आकड्याने २ महिन्यांचा रेकॉर्ड मोडला


- Advertisement -

 

- Advertisement -