Wednesday, March 3, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रतिक्षा संपली! चित्रपटगृहात प्रदर्शित होणार 'हे' मोठे चित्रपट

प्रतिक्षा संपली! चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘हे’ मोठे चित्रपट

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे गेल्या वर्षी चित्रपटगृह बंद करण्यात आले. यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहता येत नव्हते. कोरोनाच्या काळात चित्रपटगृह जरी बंद असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, चित्रपटगृहात जाऊन चि६पट पाहण्यात जी मजा आहे, ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही. दरम्यान, आता प्रेक्षकांच्या प्रतिक्षा संपली आहे. कारण लवकरच ५ मोठे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. यशराज फिल्म्सने ही घोषणा केली आहे.

यशराज फिल्म्सने ट्विट करत चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये कोणत्या तारखेला कोणता चित्रपट प्रदर्शित होणार याची माहिती देखील दिली आहे. ‘संदीप और पिंकी फरार’, ‘बंटी और बबली २’, ‘शमशेरा’, ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘पृथ्वीराज’ हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

- Advertisement -

‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट १९ मार्च २०२१ ला प्रदर्शित होईल. दिबाकर बॅनर्जीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चि६पटात अर्जुन कपूर आणि परिणिती चोपरा या दोघांची केमीस्ट्री पाहायला मिळणार आहे.

बंटी और बबली २ हा चित्रपट २३ एप्रिल २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी ही स्ट्राकास्ट या चित्रपटात आहे. आदित्य चोप्रा आणि यशराज फिल्म्स या चित्रपटाचे निर्माते आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bunty Aur Babli 2 (@buntyaurbabli2)

- Advertisement -

रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्तचा बहुप्रतिक्षित चित्रपट शमशेरा २५ जून २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा आणि यशराज फिल्म्स यांनी केली आहे.

रणवीर सिंगचा ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट २७ ऑगस्ट २०२१ ला प्रदर्शित होईल. या चित्रपटात शालिनी पांडे, बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह यांच्याही मुख्य भूमिका आहेत. दिव्यांग ठक्कर यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे, तर मनीष शर्मा आणि यशराज फिल्म्स निर्माते आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bunty Aur Babli 2 (@buntyaurbabli2)

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा पृथ्वीराज हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२१ ला दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये संजय दत्त आणि सोनू सूद हे देखील चित्रपटात आहेत.

 

- Advertisement -