घरमुंबईखंडणीप्रकरणी भाजप कार्यकर्ता सुधीर बर्गेला अटक 

खंडणीप्रकरणी भाजप कार्यकर्ता सुधीर बर्गेला अटक 

Subscribe

ठाण्यातील प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुधीर बर्गे अटक करण्यात आली आहे.

ठाण्यातील प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि भाजपवासी सुधीर बर्गे यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते शौकत मुलानी आणि आरिफ इराकी या दोन जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरटीआय कार्यकर्त्यांचे खंडणी उकळणारे रॅकेट ठाणे आणि मुंबईत कार्यरत असल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सुधीर बर्गे, शौकत मुलानी आणि आरिफ इराकी यांची नावे समोर आली.

२००७ साली नगरसेवक झाले होते

सुधीर बर्गे हे ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. सध्या ते  भाजपामध्ये  आहेत. २००७ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून सुधीर बर्गे निवडून आले होते. तर मागील महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -