घरमुंबईघरफोडी करणार्‍या चार आरोपींना अटक

घरफोडी करणार्‍या चार आरोपींना अटक

Subscribe

५ लाख १५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत

मुंब्रा परिसरात वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिले. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने खबर्‍यांच्या माहितीच्या आधारे आदिल सिराजुद्दीन खान रा. नुरीबाग एमएम व्हॅली कौसा मुंब्रा याला अटक करून तीन गुन्ह्यांची उकल केली. तसेच १ लाख ११ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिन्यांचा ऐवज आणि रोख रक्कम हातगात केली. त्याचप्रमाणे दिव्यातील घरफोडी प्रकरणी आणखीन तीन आरोपींना अटक करून सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. अटक केलेल्या तीन आरोपींकडून पोलीस पथकाने सोन्याचे दागिने असा ४ लाख ४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुंब्रा पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींकडून तब्बल १३५ ग्राम सोन्याचा ऐवज आणि रोकड असा ५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करीत ९ गुन्ह्याची एकंदर उकल करण्यात यश मिळाले.

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंब्रा आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोड्या करून लाखोंचा मुद्देमाल लांबविल्याच्या अनेक तक्रारी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या होत्या. वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांनी नागरिकांमध्ये घाबरहाट आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घरफोड्यांची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्ष मधुकर कड यांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तीन घरफोडीचे गुन्हे करणार्‍या आरोपी आदिल सिराजुद्दीन खान याला अटक केली. तर दिवा परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने खबर्‍यांच्या माध्यमातून आरोपी हर्षद गुलाब पवार(२६) रा. मुंब्रादेवी कॉलोनी, दिवा पूर्व ठाणे, सध्या पुण्यात राहणार आहे. आरोपी विकास सुनील घोडके(२३) हाही पूर्वी मुंब्रादेवी दिवा पूर्व आणि सध्या पुण्यात राहत आहे. आरोपी पंकज सहतु मोर्या (३२) रा. अँटॉप हिल, सायं कोळीवाडा, उमाबाई या तिघा अटक करून सहा घरफोडीच्या गुन्हयाची उकल करण्यात आली. अटक चार आरोपींकडून ९ घरफोडीच्या गुन्ह्यात लांबविलेल्या ४ लाख ७५ हजार ६०० रुपयांचा १३५ ग्राम सोन्याचे दागिने आणि ४० हजाराची रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -