वसईत जन्मली चार पायांची कोंबडी; बघ्यांची होतेय गर्दी

four leg hen
चार पायाची कोंबडी

वसईत जन्माला आलेल्या चार पायाच्या कोंबडीची चर्चा संपूर्ण वसईभर रंगली आहे. त्यामुळे या कोंबडीला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी जमू लागली आहे. नालासोपारा जवळील गास गावात राहणाऱ्या कॉर्नेलियस पास्कोल अल्फान्सो यांच्या घरात २९ डिसेंबर २०१९ रोजी एका अंड्यातून चार पायांच्या कोंबडीचा जन्म झाला आहे. हि कोंबडी सर्वसामान्य कोंबडी पेक्षा अतिशय वेगळी आहे. सर्वसामान्य कोंबडीला दोन पाय, दोन पंख, दोन डोळे, तोंड,तुरा असतो. मात्र या कोंबडीला पुढे दोन पाय आणि मागच्या बाजूला दोन पाय आहेत.

अल्फान्सो या कोंबडीची जास्त काळजी घेत आहेत. कारण या कोंबडीला इतर कोंबड्याप्रमाणे चालता येत नसल्याने विशेष काळजी घ्यावी लागत आहे. या कोंबडीला पाहून सगळेच चक्रावून गेले आहेत. मात्र या कोंबडीच्या जन्माची गोष्ट सांगताना अल्फान्सो थोडे अंधश्रद्ध देखील होत आहेत. ते म्हणाले की, “झोपेत आमच्या कोंबडीने चार पायाचे पिल्लू दिल्याचे माझ्या स्वप्नात आले होते. जाग आल्यावर मी कोंबडीच्या ठिकाणी जाऊन पाहिल्यावर तिने अंड्यातून १० पिल्ले दिली होती. त्यामध्ये तिने एका चार पायाच्या पिल्लाला जन्म दिला होता. ही घटना पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला”, असे अल्फान्सो सांगतात.