घरताज्या घडामोडीमुंबई अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक

मुंबई अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक

Subscribe

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या साहसी कामगिरीची दखल पालिकेसह राज्य व केंद्र सरकारने घेतली.

कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत मुंबईतील दीड कोटीहून अधिक नागरिक, त्यांचे घर, खासगी कार्यालये, सरकारी, पालिका कार्यालये, सार्वजनिक मालमत्ता आदींचे प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून संरक्षण करण्याचे व जिवीत आणि वित्तीय हानी रोखण्याचे काम मुंबई अग्निशमन दल करते. या अग्निशमन दलाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे व काही महत्वाच्या आपत्कालीन घटनांमध्ये साहसी कामगिरी करणारे उपायुक्त प्रभात रहांगदळे, अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी आत्माराम मिश्रा आणि सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी कृष्णत यादव यांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.

तसेच मुंबई अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी अनिल पवार, अग्निशामक उत्तम राठोड यांची पालिका आयुक्त शौर्य पदकासाठी निवड झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध फोर्ट विभागातील मिंट रोड परिसरात १६ जुलै २०२० रोजी  भानुशाली इमारतीची पडझड झाल्याची मोठी दुर्घटना घडली होती. सदर दुर्घटनेत १५ जण इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकले होते, तर अन्य १२ जण इमारतीच्या अन्य एका भागात अडकून पडले होते. त्यावेळी जीवाची बाजी लावून अग्निशमन दलाच्या वरील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते.

- Advertisement -

त्यांच्या या साहसी कामगिरीची दखल मुंबई महापालिकेसह राज्य सरकार व केंद्र सरकारने घेतली. त्यानुसार वरील सहा अधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक तर एक अधिकारी, एक कर्मचारी अशा दोघांना पालिका आयुक्त शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. आम्ही अग्निशमन दलात आपले कर्तव्य बजावताना केलेल्या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती पदक आम्हाला जाहीर झाले, याचा खूप आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -