घरमुंबईओप्पो फोनऐवजी आले खेळण्यातले पत्ते

ओप्पो फोनऐवजी आले खेळण्यातले पत्ते

Subscribe

ऑनलाईन फोन खरेदी करणाऱ्या तरुणाला मोबाईलऐवजी खेळण्यातले पत्ते आणि कमरेचा पट्टा आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, ऑनलाईन फसवणुकीचेही प्रकार समोर येताना दिसत आहेत. कल्याणमधील एका तरूणाने साडेचार हजार रूपये भरून ओप्पो फोन मागविला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याला फोनऐवजी खेळण्यातले पत्त आणि कमरेचा पट्टा पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

कल्याणमधील तरूणाची फसवणूक

कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात राहणारे त्रैलोकी पांडे हा तरूण सुरक्षा रक्षकाचे काम करतो. १२ जुलै रोजी त्याला त्याच्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला. ‘तुमच्या फोन नंबरवर, ओप्पो कंपनीची स्पेशल ऑफर असून एफ ९ प्रो हा महागडा फोन तुम्हाला अवघ्या साडेचार हजारात मिळणार आहे. तसेच त्याबरोबर घड्याळ आणि चष्माही मोफत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या आमिषाला भुलून त्रिलोकी यांनी ऑफर स्वीकारून त्याची डिलिव्हरी करण्यास सांगितले. त्यानंतर १४ जुलै रोजी पांडे यांना तुमचा फोन स्पीडपोस्टने पाठवला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा २४ जुलै रोजी टिळक चौक पोस्ट ऑफिसमधून तुमचे पार्सल आल्याचे दिल्लीहून सांगण्यात आले. त्यानुसार त्रिलोकीने पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन साडेचार हजार रुपये भरून पार्सल घेतले. ते तिकडेच उघडून पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. त्या बॉक्समध्ये ओप्पो फोनऐवजी खेळण्यातले पत्त्यांची दोन पाकिटे आणि दोन कमरेचे पट्टे होते. याबाबात त्यांनी पोस्ट ऑफिसकडे विचारणा केली असता, त्यांनी आम्हाला काहीही माहिती नाही. आमचे काम केवळ पार्सल देण्याचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीला फोन केला. मात्र, त्यांचा फोन उचलून कट करण्यात आला आणि नंतर तो बंद ठेवण्यात आल्याचे त्रिलोकीने सांगितले आहे. आपली फसवणूक झाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ऑनलाईन शॉपिंग; ३६० रूपयांचा टी-शर्ट पडला लाखात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -