घरमुंबईआपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम - 'सेल्फी विथ बाप्पा', 'कोकण गणेशोत्सव...

आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम – ‘सेल्फी विथ बाप्पा’, ‘कोकण गणेशोत्सव स्पर्धा २०२१’

Subscribe

महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाच्या गणेशोत्सवास १० सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन आनंदाने टाळ मृदुंगाच्या गजरात केले जाते. त्याला सुंदर सजावट केलेल्या मखरात बसवले जाते. त्यावेळी निर्माण होणार्‍या याच आनंदलहरी आपल्याला या कोरोना काळात जगण्याची नवीन उमेद देतात. आपल्या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी आपलं महानगर आणि माय महानगर डॉट कॉम दरवर्षीप्रमाणे सेल्फी विथ बाप्पा आणि कोकण गणेशोत्सव हे उपक्रम घेऊन येत आहे.

कोकण गणेशोत्सव उपक्रम

गणेशोत्सव म्हटले की डोळ्यासमोर येते ते कोकण. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी पर्वणीच. या दिवसात घरोघरी बनवले जाणारे उकडीचे मोदक, हळदीच्या पानातल्या पातोळ्या, पुरणपोळी, वालाची उसळ, अनारसे, शिरा, नारळाच्या वड्या, खीर तांदळापासून बनवलेले नैवेद्याचे पदार्थ आणि घराघरात होणारे भजन, नमन आणि बाल्या नृत्य यांचे आकर्षण केवळ कोकणी माणसालाच नव्हेतर जगभरातील मराठी माणसाला असते. या सगळ्यांचे व्हिडिओ आम्हाला पाठवा. आम्ही याच व्हिडिओतून कोकणातला गणेशोत्सव जगभरात पोहोचवू. आपले कोकण गणेशोत्सवाचे व्हिडिओ आमच्या 7506071006 या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर किंवा [email protected] वर मेल करा.

- Advertisement -

आपलं महानगर सेल्फी विथ बाप्पा

महाराष्ट्राचे लाडक दैवत असलेल्या बाप्पाच्या गणेशोत्सवास १० सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन आनंदाने टाळ मृदुंगाच्या गजरात केले जाते. त्याला सुंदर सजावट केलेल्या मखरात बसवले जात. त्यावेळी निर्माण होणार्‍या याच आनंदलहरी आपल्याला या कोरोना काळात जगण्याची नवीन उमेद देतात. यामुळे बाप्पाचे घरात स्थानापन्न होणे ही सगळ्यांसाठीच आनंदाची घटना असते. तुमच्या याच बाप्पाबरोबरचे तुमचे सेल्फी आम्हांला पाठवा. तुमचे तेच देखणे सेल्फी आमच्या ’माय महानगर पोर्टल’ आणि ’आपलं महानगर’ वृत्तपत्रात ’सेल्फी विथ बाप्पा’ मथळ्याखाली छापले जातील. ‘आपलं महानगर’ आणि माय महानगर डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त ‘सेल्फी विथ बाप्पा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आलाआहे. त्यात सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील श्रींची शाडूची मूर्ती आणि पर्यावरणस्नेही आरास या समवेत गणेश भक्तांनी सेल्फी पाठवावेत. त्यासाठी आपलं महानगरच्या ७६६६६९०८६७ या व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर सेल्फी पाठवावेत. त्यात आपले नाव व संपर्क क्रमांकाचाही उल्लेख करावा. त्यातील निवडक फोटोंना mymahanagar.com या वेब पोर्टलवर, तसेच ‘आपलं महानगर’च्या अंकात प्रसिद्धी दिली जाईल.

 

- Advertisement -

सुरभी तेजस शेरताटे, नाशिक

 

नेत्रा पंकज भानुवंशे,नाशिक

 

किशोर रामदास बागुल,ठाणे

 

गौरी बेहरे, अमरावती

 

उमेश सदाशिवराव, अंधेरी

 

शिल्पा चेतन जवार,नाशिक

 

प्रियांका गोस्वामी, नाशिक

 

वर्षा डेरे, नाशिक

 

कविता राजीव प्रधान, नाशिक

 

वैष्णवी महादेव वाघ, नाशिक

 

भार्गवी मंगेश इराचे, नाशिक

 

श्रमना सागर जाधव,पुणे

 

प्रसाद गणपत सावंत, वांद्रे

 

बाबासाहेब नांगरे, मुंबई


हेही वाचा – आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम ‘बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१’, जिंका पैठणी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -