Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर सणवार आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम 'बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१', जिंका...

आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम ‘बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१’, जिंका पैठणी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाचे आगमन १० सप्टेंबर रोजी होत आहे. बाप्पाला गोड पदार्थ प्रिय आहे. यामुळे बाप्पाच्या या दहा दिवसांच्या मुक्कामात त्याला रोज गोडा धोडाचे नैवेद्य दाखवले जातात. घरात पावण्या रावण्यांच्या पंगती झडतात. यामुळे हे दिवस महिला वर्गासाठी खास असतात. बाप्पासाठी रोज खास नैवेद्य दाखवण्याचे आव्हानच महिलांपुढे असते. तुमच्या याच खास नैवेद्य रेसिपींचे व्हिडीओ आम्हाला पाठवा. ज्या व्हिडीओला प्रेक्षकांचे सर्वाधिक व्हयूज मिळतील ती रेसिपी बक्षिसास पात्र ठरेल.

व्हिडिओ कुठे पाठवालं?

यासाठी स्पर्धकाने एकाच रेसिपीचा व्हिडीओ पाठवावा. हा व्हिडीओ पाच मिनिटापेक्षाही कमी कालावधीचा असावा. पदार्थासाठी लागणारे साहीत्य आणि कृतीचाही उल्लेख स्पर्धकाने व्हिडीओत करावा. रेसिपीचा व्हिडीओ ७५०६०७१००६ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.

- Advertisement -

बक्षिसाचे स्वरुप

प्रथम बक्षीस- पाच वारी पैठणी साडी

- Advertisement -

द्वितीय बक्षीस- २००० रुपये रोख

तृतीय बक्षीस- १५०० रुपये रोख


हेही वाचा – आपलं महानगर, my mahanagar.com-सेल्फी विथ बाप्पा, कोकण गणेशोत्सव स्पर्धा २०२१


- Advertisement -