कांदिवलीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; ९ जण जखमी

घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन नऊ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना कांदिवलीमधील समतानगर परिसरात घडली आहे.

Gas Cylinder blast in kandivali

घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन नऊ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना कांदिवलीमधील समतानगर परिसरात घडली आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी धांडे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील मदतकार्य सुरु आहे.

नेमके काय घडले?

कांदिवलीमधील समतानगर परिसरात बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जानुपाडा परिसरात राहणारे गवारे चाळीतील कानडे घरातील गँस सिलेंडर लावत असताना हा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये कानडे कुटुंबातील सदस्यांबरोबच शेजारचे काही लोकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये सर्व जखमी २० ते २५ टक्के भाजले असून त्यांना तात्काळ मोबाइल व्हॅनमधून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमींची नावे खालीलप्रमाणे