घरमुंबईगेटची परीक्षा ५ फेब्रुवारीपासून

गेटची परीक्षा ५ फेब्रुवारीपासून

Subscribe

सध्या ही परीक्षा ५ ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. याबाबतचा अधिक तपशील विद्यार्थ्यांना https://gate.iitb.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल.

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ प्रवेश प्रक्रिया यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. देशातील आयआयटी, इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांच्या प्रतिनिधींची गेट २०२१ कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. यंदा आयआयटी मुंबईतर्फे ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा कशी घ्यायची हे आव्हान आयआयटी मुंबईसमोर होते. नुकत्याच झालेल्या बैठकीत ही परीक्षा रोज दोन सत्रांमध्ये घेण्याचे निश्चित झाले आहे. यावर्षी या परीक्षेत दोन अतिरिक्त विषयांचा समावेश झाल्याने ही परीक्षा २७ विषयांसाठी होणार आहे. एक विद्यार्थी एका अर्जावर दोन विषयांच्या परीक्षेला बसू शकतो. अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या पाहून भविष्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असेही यावेळी ठरविण्यात आले. सध्या ही परीक्षा ५ ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. याबाबतचा अधिक तपशील विद्यार्थ्यांना https://gate.iitb.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -