घरमुंबईहेडफोन लावून रूळ ओलांडणे तरूणीच्या जीवावर बेतले

हेडफोन लावून रूळ ओलांडणे तरूणीच्या जीवावर बेतले

Subscribe

कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. अनु दुबे असे या तरुणीचे नाव आहे. ती २३ वर्षांची होती कल्याण स्थानकात ही घटना घडली. रूळ ओलांडताना लोकलने दिलेल्या धडकेत या तरूणीचा मृत्यू झाला आहे.

वेळ वाचवण्यासाठी दररोज हजारो प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. कल्याण स्थानकावर सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला रेल्वेकडून समांतर भिंत बांधण्याचे काम सुरू आहे.हे काम अपूर्ण आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी भिंत नसलेल्या वाटेचा पायवाट म्हणून प्रवासी वापर करत होते. वेळ वाचवण्यासाठी दररोज शेकडो प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलंडतात. याच मार्गाने अनु सुद्धा जात होती. मात्र तिच्या कानात हेडफोन असल्याने तिला रेल्वे येत असल्याचे न दिसल्याने धडक बसली. अनु दुबेही रेल्वे रूळ ओलांडत असता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणाऱ्या धीम्या लोकलने तरुणीला धडक दिली. या अपघातात अनु दुबे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी अनु दुबे या तरुणीच्या मृत्यूची अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -

लोकल पकडण्यासाठी अनेकदा धावपळ करताना रेल्वेचा रूळ ओलांडला जातो. मात्र काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडणं हे जीवावर बेतू शकतं हा संदेश देण्यासाठी 7 नोव्हेंबरला चक्क पश्चिम रेल्वेने ‘यमदूत’ रेल्वेच्याच्या रूळांवर उतरवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -