घरमुंबईउल्हासनगरात चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग

उल्हासनगरात चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग

Subscribe

विद्यार्थिनीची धावत्या रिक्षातून उडी

उल्हासनगर शहरात भरदिवसा लुटमारी, चोर्‍या तसेच विनयभंग असे प्रकार सातत्याने घडत असताना कॉलेजमध्ये रिक्षातून जाणार्‍या एका विद्यार्थिनीवर रिक्षातच एका तरुणाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली असता त्या तरुणाने देखील उडी मारून तरुणीला त्रास देणे सुरूच ठेवले.

सकाळी नऊच्या सुमारास उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २१ वर्षांची एक विद्यार्थिनी कॉलेजला जाण्यासाठी रिक्षात बसून उल्हासनगर स्टेशनला जात होती. त्यावेळी त्या रिक्षात अगोदरच २० ते २५ वर्षीय तरुण तोंडाला हिरव्या रंगाचा मास्क लावून बसलेला होता. त्याने रिक्षात त्या विद्यार्थिनीला छेडछाड करण्याच प्रयत्न सुरू केला असता त्या विद्यार्थिनीने रिक्षाचालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितली. पण तो रिक्षावालाही त्या तरुणासोबत असल्याने त्यानेही रिक्षा न थांबवता जोरात पळवली. रिक्षात बसलेली ती विद्यार्थिनी खूपच घाबरलेली असताना रिक्षात तोंडाला मास्क लावलेल्या अवस्थेत बसलेला तरुण तिच्यावर जबरदस्ती करीत असताना त्या विद्यार्थिनीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली.

- Advertisement -

हे पाहून त्या तरुणाने देखील रिक्षातून उडी मारून त्रास देण्याचा प्रकार सुरूच ठेवला. हा प्रकार पाहून रस्त्यावरील नागरिकांनी धाव घेतल्याने तो तरुण रिक्षात बसून पळून गेला. या प्रकरणी धास्तावलेल्या विद्यार्थिनीने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या रिक्षाचालकासह त्या तरुणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत. शहरात भरदिवसा ही घटना घडल्याने महिलांमध्ये संताप पसरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -