घरमुंबईलग्नाचे आश्वासन देऊन युवतीवर बलात्कार

लग्नाचे आश्वासन देऊन युवतीवर बलात्कार

Subscribe

एका २९ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. भिवंडीत हा प्रकार घडला आहे.

एका २९ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या पीडित मुलीच्या घरच्यांचे याची विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. भिवंडीतील पद्मानगर परिसरात ही घटना घडली आहे. धामणकर नाका परिसरात राहणारी पीडित सोबत आरोपी साईनाथ रामचंद्र पोतन याने हे कृत्य केले आहे.

कसा घडला प्रकार

पीडित युवतीसोबत ओळख वाढवून त्या ओखितून लग्नाचे आमिष देत पीडितेवर डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात राजनोली नाका येथील अतिथी लॉज या ठिकाणी नेवून बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने लग्नास नकार देण्यास सुरवात केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने साईनाथ पोतन याच्या पदमानगर येथील कुंदन बिल्डिंग येथील घरी जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता साईनाथ चे कुटुंबीय भाऊ आई श्रीनिवास, श्रीहरी, सरस्वती पोतन, अनुराधा चेरियाल, संपतकुमार चेरियाल यांनी पीडितेस शिवीगाळ करीत मारहाण करीत परत लग्नाबाबत विचारणा केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या मध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता बलात्काराचा गुन्हा कोनगाव पोलीस ठाण्यात घडल्यामुळे सदरची तक्रार कोनगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पोलिसांनी बलात्कारासह मारहाण केल्या बद्दल गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपस पोलीस उपनिरीक्षक शेले हे करीत असून ते फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -