घरमुंबईगोखले पूल दुरुस्तीसाठी बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गाचे आवाहन

गोखले पूल दुरुस्तीसाठी बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गाचे आवाहन

Subscribe

अंधेरीतील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर हा पूल काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांचा पर्यायी मार्गावरून जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. या पुलाच्या दुरूस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

एलफिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मंगळवार, ३ जुलै रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास अंधेरी आणि विलेपार्ले धील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पादचारी पूल अचानक कोसळला. या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हा पादचारी पूल वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आला आहे. या पूलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे हे पूल काही दिवस बंद राहणार असल्याचं वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त अमिलेश कुमार यांनी सांगितलं आहे. तोपर्यंत प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असंही आवाहन करण्यात आलं आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग 

  • बाळासाहेब ठाकरे पूल, जोगेश्वरी
  • मीलन उड्डाणपूल, सांताक्रूझ
  • मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव
  • कॅप्टन गोरे पूल, विलेपार्ले
  • अंधेरी सब-वे
  • खार सब-वे

१६ तासानंतर वाहतूक सुरळीत

गोखले पुलाच्या दूर्घटनेनंतर मंगळवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळपासूनच ठप्प झाली होती. परंतू तब्बल १६ तासानंतर पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. रात्री उशीराने अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवरील वाहतुक सुरू करण्यात आली. प्रथम केवळ जलद मार्गावरील रेल्वे सुरू झाल्या. तर बुधवारी सकाळपासून धिम्या मार्गावरीलही वाहतुक सुरू करण्यात आली आहे. नेहमीपेक्षा पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनीटं उशीराने धावत असून अजूनही रेल्वे रूळाच्या कडेला कोसळलेल्या पुलाच्या मातीचा ढिगारा पडलेला दिसतो. रेल्वे जाण्याइतपत रूळ मोकळा करून देण्यात आला असला तरी अद्याप बराच ढिगारा उचलण्याचे काम आज केले जाणार आहे. सकाळी पश्चिम मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी अंधेरी स्थानक येताच या घटनास्थळाची कुतुहलतेने पाहणी केली. मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेची तिव्रता त्या प्रवाशांना तुटलेल्या पुलाकडे पाहून जाणवू लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -