घरमुंबईडोंबिवलीतील गुडविन ज्वेलर्सला ऐन दिवाळीत टाळं; ग्राहक हवालदिल

डोंबिवलीतील गुडविन ज्वेलर्सला ऐन दिवाळीत टाळं; ग्राहक हवालदिल

Subscribe

हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी शनिवारी गुडविन ज्वेलसच्या शाखांमध्ये एकच गर्दी केली होती. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवलीतील गुडवीन ज्वेलर्सला मागील सहा दिवसांपासून टाळं लागल्याने हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. गुडवीन ज्वेलर्समध्ये भिशी योजना, फिक्स डिपॉझिट या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रूपये गुंतवले आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी शनिवारी गुडविन ज्वेलसच्या शाखांमध्ये एकच गर्दी केली होती. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सकडून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाली होती. त्यामुळे हजारो नागरिक ऐन सणासुदीत चिंतेत सापडले आहेत.

ग्राहकांची पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवली पूर्वच्या मानपाडा रोडवर गुडविन ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये डोंबिवलीकरांनी भिशी योजना, फिक्स डिपॉझिट या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. २१ तारखेला हे दुकान दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना दुकानाबाहेर लावून दुकान बंद करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सहा दिवस उलटूनही हे दुकान सुरू झालेलं नाही. त्यामुळं गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. सोमवारी शेकडो गुंतवणूकदारांनी दुकानाबाहेर गर्दी केली. यापूर्वीही डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स अशाचप्रकारे बंद करण्यात आलं होतं. त्यातही कोट्यवधी रुपये अडकले होते. सध्या पीएमसी घोटाळा गाजत असून त्यानंतर आता गुडविन ज्वेलर्सकडूनही अशीच फसवणूक होते का? अशा विवंचनेत गुंतवणूकदार सापडले आहेत. गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दुकानाला सील लावला असून, तपास सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -