घरमुंबईराज्यपालांनी केली मुंबई मॅरेथॉनसाठी नावनोंदणी

राज्यपालांनी केली मुंबई मॅरेथॉनसाठी नावनोंदणी

Subscribe

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मुंबई मॅरेथॉनसाठी नावनोंदणी केली आहे.

श्रीमंत-गरीब, तरुण–वृद्ध, महिला–पुरुष, दिव्यांग–सामान्य यांसारखे सर्व भेद दूर करणारी मॅरेथॉन स्पर्धा ही लोकशाही आणि सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारी स्पर्धा आहे. प्रत्येक गाव, जिल्हा तसेच महानगराकरिता आपली एक मॅरेथॉन स्पर्धा असावी. त्यातून परस्पर बंधुभाव वाढून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल, असे उद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले. बुधवारी राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या नावनोंदणीला सुरुवात झाली. यावेळी राव बोलत होते. १९ जानेवारी २०२० रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील ५० हजार लोक

मॅरेथॉन स्पर्धेने फिटनेस आणि आरोग्याबद्दल व्यापक जनजागृती केली आहे. स्पर्धेने विविध समाजसेवी संस्थांसाठी ४० कोटी निधी उभारले आहेत, याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले. २०२० साली होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेत ५० हजार लोक सहभागी होतील. तसेच मॅरेथॉनच्या माध्यमातून सेवा कार्यासाठी ५० कोटी रुपये निधी संकलित केला जाईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई मॅरेथॉन ही पर्यावरण पूरक ग्रीन मॅरेथॉन होईल, असा विश्वास वनमंत्री सुधीर गुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. शालेय शिक्षण व क्रिडा मंत्री अशिष शेलार यांनी मुंबई मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, उपमहापौर हेमांगी वरळीकर, रिअर ॲडमिरल राजेश पेंढारकर, शायना एन सी व प्रायोजक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांकडून स्वाक्षरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -