घरक्राइमप्रियकराने लग्न केलं म्हणून प्रेयसी संतापली; नववधूच्या डोळ्यात ओतलं फेवीक्विक

प्रियकराने लग्न केलं म्हणून प्रेयसी संतापली; नववधूच्या डोळ्यात ओतलं फेवीक्विक

Subscribe

प्रियकराने दुसऱ्या मुलाशी लग्न केले म्हणून संतप्त झालेल्या प्रेयसीने नववधूवरच हल्ला केला. प्रेयसीने रागात प्रियकराच्या पत्नीचे केस कापत तिच्या डोळ्यांमध्ये फेवीक्विक ओतल्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या नालंदा येथे घडला. फेवीक्विक ओतल्याने पीडित नवरीची दृष्टी जाण्याची भीती आहे. या घटनेची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी मोहम्मद शिब्ली नोमानी यांनी दिली.

प्रियकर गोपाल रामने प्रेमात विश्वासघात करत दुसऱ्या मुलीशी लग्न केले म्हणून प्रेयसी नाराज झाली. ही प्रेयसी प्रियकर गोपालच्या बहिणीची मैत्रिण होती. गोपालचे १ डिसेंबरला दुसऱ्या मुलीशी लग्न झाले. शेखापुरा येथे लग्न झाल्यानंतर तो त्याची पत्नी आणि नातेवाईकांसह मोरा तलाव गाव येथे आपल्या घरी आला. गोपलने लग्न केल्याची माहिती मिळताच प्रेयसी रागात गोपालच्या घरी आली. कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना तिने नववधूच्या खोलीत गेली. त्यानंतर तिने नववधूचे केस कापले आणि तिच्या डोळ्यात फेवीक्विक ओतले.

- Advertisement -

गोपालच्या प्रेयसीने डोळ्यात फेवीक्विक टाकताच नवरीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पीडित नवरी डोळ्यात फेवीक्विक वेदनेने तडफडू लागली. फेवीक्विक टाकल्या नंतर प्रेयसीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबातील लोकांनी तिला पकडले आणि तिचा पळण्याचा प्रयत्न फसला. तिला रात्रभर बांधून ठेवले आणि मारहाण केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्कळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचताच कुटुंबियांनी प्रेयसीला पोलिसांकडे दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -