घरताज्या घडामोडीराणी बागेच्या 'व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद

राणी बागेच्या ‘व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद

Subscribe

राणी बागेच्या प्रशासनाने सुरू केलेल्या या 'व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफरीच्या तीन भागांना पर्यटकांनी, बच्चे कंपनी व पालक मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आता राणी बाग प्रशासनाने, जागतिक चिमणी दिवस (२० मार्च) व जागतिक वन दिन (२१ मार्च) या दोहोंचे औचित्य साधून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या 'व्हर्चुअली वाईल्ड' या आभासी सफर मालिकेतील चौथ्या भागाचे अनावरण अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते सोमवारी केले.

मुंबईत मार्च २०२० ला कोविड संसर्गाला सुरुवात झाली. त्यावेळी कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राणी बाग काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली. त्यावेळी पर्यटकांची व बच्चे कंपनीची घोर निराशा झाली होती. त्यावर पर्याय म्हणून पालिका राणी बाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाने ‘व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफर सुरू केली. त्यामुळे पर्यटक व बच्चे कंपनी यांना घरी बसल्या राणी बागेचे व त्यातील प्राण्यांचे मनमुराद आनंद लुटता आला.

राणी बागेच्या प्रशासनाने सुरू केलेल्या या ‘व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफरीच्या तीन भागांना पर्यटकांनी, बच्चे कंपनी व पालक मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आता राणी बाग प्रशासनाने, जागतिक चिमणी दिवस (२० मार्च) व जागतिक वन दिन (२१ मार्च) या दोहोंचे औचित्य साधून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या ‘व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफर मालिकेतील चौथ्या भागाचे अनावरण अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते सोमवारी केले.

- Advertisement -

या कार्यक्रमासाठी उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी, उपअधीक्षक (पशुवैद्यकीय) डॉ. कोमल राऊळ तसेच प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. ह्या आभासी मालिकेचे सर्व भाग ‘द मुंबई झू’ ह्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येतील.
राणी बाग प्रशासनाने, ‘व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफरीचा प्रोमो ५ जून २०२१ रोजी राणी बागेतील सभागृहात तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थित करण्यात आला होता. त्यासंदर्भातील व्हिडिओला १० हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज आहेत. त्यानंतर, १५ ऑगस्ट २०२१ रोजी ‘व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफरीचा पहिला भाग ‘राणी बागेचा इतिहास’ या विषयावर बनविण्यात आला होता. या व्हिडीओला ९ हजार ५०० पेक्षाही जास्त व्ह्यूज आहेत.

तर दुसरा भाग १ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘पेंग्विन’ या विषयावर बनविण्यात आला होता. त्यास ७ हजार ३०० व्ह्यूज आहेत. त्यानंतर, तिसरा भाग ‘पाणपक्षी’ या विषयावर बनविण्यात आला. त्यास १ हजार १०० व्ह्यूज आहेत. आता चौथा भाग २२ मार्चपासून पर्यटकांना घरबसल्या बघायला, अनुभवायला मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी व सोशल भाग सांभाळणारे अभिषेक साटम यांनी दिली आहे.

- Advertisement -

१९ नोव्हेंबर १८६२ रोजी राणी बाग म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी या ऐतिहासिक घटनेला व वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा करण्याचे योजिले आहे.


हेही वाचा –  मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी डास प्रतिबंधक उपाययोजना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -