घरमुंबईवालीवमधील ज्ञानदीप शाळेसमोर सांडपाणी

वालीवमधील ज्ञानदीप शाळेसमोर सांडपाणी

Subscribe

विद्यार्थी, शिक्षक घाणीमुळे बेजार,शिवसेनेचा पालिकेला इशारा

वसई-विरार शहर महापालिकेतील धानिव-पेल्हार प्रभाग समिती क्षेत्रात वालीव येथील ज्ञानदीप विद्या मंदिर शाळेच्या समोरील मुख्य रस्त्यावर कंपनी व रहिवासी संकुलातील सांडपाणी साचल्याने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून ये-जा करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थी आणि परिसरातील रहिवाशांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची त्वरीत साफसफाई केली नाही तर सांडपाणी पेल्हार पालिका कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

महापालिकेच्या धानिव-पेल्हार प्रभाग समितीच्या आरोग्य विभागाच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. गावराईपाडा शिवसेना शाखेशेजारी असलेल्या विहिरीचे पाणी दूषित होऊन त्यातील मासे मृत झाले होते. ही बाब आरोग्य विभागाला दिली असता त्यांनी दुर्लक्ष केेले होते. अखेर विरार मुख्यालयातून विहीर साफ करण्यात आली. धानिव-पेल्हार प्रभाग समिती क्षेत्रातील वालीव येथे ज्ञानदीप विद्या मंदिर ही शाळा आहे.

- Advertisement -

शाळेच्या आसपास औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांतील सांडपाणी गटारात न जाता शाळेसमोर तुंबलेले आहे. या तुंबलेल्या सांडपाण्यातून शाळेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना ये-जा करावे लागते. त्यामुळे शिवसेनेचे शाखा प्रमुख सुकिशन काशिदे यांनी महापालिकेला या सांडपाण्याबाबत व संबंधीत कंपन्यांवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे.सदरचे सांडपाणी साफ न केल्यास तेच सांडपाणी महापालिका कार्यालयात आणून टाकण्याचा इशाराही आरोग्य विभागाला देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -