घरमुंबईहार्बर लोकलचा होणार विस्तार

हार्बर लोकलचा होणार विस्तार

Subscribe

7 किमी लांबीसाठी 826 कोटी रुपयांचा खर्च

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते गोरेगाव जोडणार्‍या हार्बर मार्गाचा विस्तार आता पश्चिम रेल्वेच्या बोरीवलीपर्यंत करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी 7 किलोमीटर लांबीच्या असलेल्या या प्रकल्पासाठी 826 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे सीएसएमटी ते बोरीवलीपर्यंतही लोकल प्रवास शक्य होणार आहे.

सीएसएमटीवरून हार्बरच्या प्रवाशांना गोरेगावपर्यंतच प्रवास करता येतो. हार्बरचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यासाठी एप्रिल 2018 उजाडावे लागले. अंधेरी ते गोरेगाव हार्बरच्या मूळ योजनेची घोषणा 2009 मध्ये करण्यात आली होती. परंतु, कामे पूर्ण करायला डिसेंबर 2017 पर्यंतची वाट पहावी लागली. प्रत्यक्षात एप्रिल 2018 मध्ये गोरेगावपर्यंत हार्बर लोकल धावायला लागली. आता हार्बरचा बोरीवलीपर्यंत विस्तार करण्याची योजना मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प 3 (अ) अंतर्गत आखण्यात आली असून त्यासाठी 825.58 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा प्रकल्प पश्चिम रेल्वे पूर्ण करणार असून सध्याच्या गोरेगाव ते बोरीवली मार्गाच्या पश्चिम बाजूला रेल्वेच्या वाहतुकीला कोणतीही बाधा न आणता हे काम केले जाणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेचा अंधेरी आणि बोरीवलीचा विभाग अत्यंत गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

येथे लोकल गाड्यांना सर्वाधिक गर्दी असते. जर हार्बरचा विस्तार अंधेरी ते बोरीवलीपर्यंत झाला तर प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन पश्चिम रेल्वेच्या गाड्यांची गर्दी त्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले की,एमयुटीपी-3 ए ला मंजुरी मिळाल्यानंतर विस्ताराच्या कामाला गती देण्यास सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होताच चार ते पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -