घरमुंबईरश्मी शुक्ला अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या, हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक दावा

रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या, हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक दावा

Subscribe

विरोधी पक्षनेत्यांकडून तपास भरकटवण्याचा प्रयत्न - मुश्रीफ

रश्मी शुक्ला यांच्या अहवालातील अस्थापना मंडळाच्या बदल्या या संमतीने झाल्या होत्या त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप तकलादू होता आणि लवंगी फटाक्यासारखा होता हे सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपींग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०१९ रोजी ज्या वेळी विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले त्यानंतर रश्मी शुक्ला या अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या, या अपक्ष आमदारांना भाजपसोबत जाण्यासाठी सांगत होत्या. याबाबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही या प्रकरणाला दुजोरा दिला असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्यास सांगितले होते. याबाबत यड्रावकर यांनी मला कल्पना दिली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही बैठकीदरम्यना कळवले असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदारांना भाजपला पाठिंबा देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे आमिष दाखवले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगतिल आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, अपक्ष आमदारांचे सीडीआर रिपोर्ट जप्त करुन रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कारवाई करणे गरजेचे असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणा भीमदेवी थाटात सांगितले की दिल्लीत जाऊन अहवाल सादर करणार यानंतर त्यांनी दिल्लीतील गृहसचिवांना अहवाल दिला. परंतु यानंतर हे सिद्ध झाले आहे की, अशी कोणतीही गोष्ट नाही. सत्ता गेल्यामुळे फडणवीसांनी जो थयथयाट सुरु केलाय तो थांबवायला पाहिजे. कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही यावर बैठक घेतली यातून महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी जनतेची माफी मागावी त्यांनी जनतेचा अपमान केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल क्रिकेट खेळत होते त्यानंतर त्यांनी वक्तव्य केले की, लूज बॉल आला की मी सीमेपार टोलावतो परंतु एकही बॉल ते सीमेपार टोलवू शकले नाही. एक बॉल उडवला तोही झेलबाद झाला असता. देवेंद्र फडणवीस यांची फलंदाजी पाहिली परंतु ते काही उत्तम खेळू शकले नाही. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

उद्योजक मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची सखोल चौकशी तपास यंत्रणा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाच्या पाठीशी असलेला खरा सुत्रधार समोर येणे आवश्यक आहे. परंतु भाजप व विरोधी पक्षनेत्यांकडून तपास भरकटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर महाराष्ट्र एटीएसने तपास केला असता तर खरे चेहरे बाहेर आले असते असेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -