घरमुंबईएचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवींचा मृतदेह सापडला

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवींचा मृतदेह सापडला

Subscribe

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला आहे. कल्याणमधील मलंगड रोडवरील काकड गावाजवळ सिध्दार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

५ सप्टेंबरपासून बेपत्ता असलेल्या एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला आहे. कल्याणमधील मलंगगड रोडवरील काकड गावाजवळ सिध्दार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. ५ सप्टेंबरलाच त्यांची हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह काकड गावाजवळ टाकण्यात आला होता. सडलेल्या अवस्थेत सिध्दार्थ यांचा मृतेह सापडला आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नवी मुंबई पोलीस देखील घटास्थळावर आले आहेत. सिध्दार्थ यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

- Advertisement -

सिध्दार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला

एचडीएफसी बँकेत उपाध्यक्ष असणारे सिध्दार्थ संघवी यांची नोकरीमध्ये मिळत असलेल्या यशामुळे हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी सिध्दार्थ यांच्या हत्येप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले होते. त्यामधील एका आरोपीने सिध्दार्थ यांच्या हत्येची कबूली दिली होती. पोलिसांनी अटक केलेल्या चार संशयित आरोपींपैकी दोन जण सिध्दार्थ याचे सहकारी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये २० वर्षाच्या तरुणाचा देखील समावेश आहे. सुपारी देऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र नेमकी सुपारी कोणी दिली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे सिध्दार्थ यांची कमला मिल कम्पाऊंडमधील पार्किंमध्येच त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

५ सप्टेंबरपासून होते बेपत्ता

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष ३९ वर्षीय सिध्दार्थ संघवी ५ सप्टेंबरला मुंबईच्या कमला मिल कंपाऊडमधल्या एचडीएफसी बँकेच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. ६ सप्टेंबरला सिध्दार्थ यांची मारुती कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे सापडली. या कारमध्ये रक्ताचे डाग आढळले होते. सिध्दार्थ मलबार हिल परिसरात कुटुंबासोबत राहतात. ५ सप्टेंबरला रात्री उशीरापर्यंत घरी न आल्यामुळे त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. एन एन जोशी मार्ग पोलीस आणि नवी मुंबई क्राईम ब्रांच या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. जवळपास ७० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित बातमी – 

बेपत्ता एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवी यांची हत्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -