घरमुंबईबेपत्ता एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवी यांची हत्या

बेपत्ता एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवी यांची हत्या

Subscribe

५ सप्टेंबरपासून बेपत्ता असलेल्या एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ संघवी यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सुपारी देऊन त्यांची हत्या केली असल्याचे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने सांगितले.

गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ किरण संघवी यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. नवी मुंबई पोलिसांनी चार संशयिताला अटक केली आहे. या संशयित आरोपीने चौकशी दरम्यान सिध्दार्थ संघवी यांच्या हत्येची कबूली दिली आहे. ५ सप्टेंबर म्हणजेच बुधवारपासून सिध्दार्थ सिंघवी बेपत्ता होते. सिध्दार्थ संघवी बुधवारी ऑफिसमधून मलबार हिल येथिल त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र ते घरीच पोहतले नाही.

सिध्दार्थ यांच्या हत्येची दिली सुपारी

नवी मुंबई पोलिसांनी सिध्दार्थ संघवी यांच्या बेपत्ता प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चार संशयित आरोपिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी सिध्दार्थ यांच्या हत्येची कबूली दिली आहे. सिध्दार्थ यांच्या हत्येसाठी सुपारी दिली असल्याचे देखील त्याने सांगितले. अद्याप त्यांचा मृतदेह सापडला नाही. मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे. सिध्दार्थ यांच्या मोबाईल लोकेशन आणि सीडीआरमार्फत शोध सुरु आहे. सिध्दार्थ यांच्या हत्येसाठी नेमकी सुपारी कोणी दिली हे अद्याप उघड झाले नाही.

- Advertisement -

५ सप्टेंबरपासून होते बेपत्ता

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष ३९ वर्षीय सिध्दार्थ संघवी ५ सप्टेंबरला मुंबईच्या कमला मिल कंपाऊडमधल्या एचडीएफसी बँकेच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. ६ सप्टेंबरला सिध्दार्थ यांची मारुती कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे सापडली. या कारमध्ये रक्ताचे डाग आढळले होते. पोलिसांनी रक्ताचे नमुने घेऊन ते तपासाला पाठवले आहेत. एन एन जोशी मार्ग पोलीस आणि नवी मुंबई क्राईम ब्रांच या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. जवळपास ७० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पत्नीने केली होती पोलिसात तक्रार

सिध्दार्थ संघवी बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत घरी पोहचले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सिध्दार्थ यांच्या कमला मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या एचडीएफसीच्या ऑफिसचे सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली होती. त्यामध्ये ते बुधवारी संद्याकाळी साडेसात वाजता ऑफिसबाहेर पडल्याचे दिसत आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सर्व पोलिसांना माहिती दिली. दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी सिध्दार्थ यांची कार सापडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -