घरताज्या घडामोडीम्हणून बॉयफ्रेंडला मिळाला बलात्कार प्रकरणात जामीन

म्हणून बॉयफ्रेंडला मिळाला बलात्कार प्रकरणात जामीन

Subscribe

मुंबई हायकोर्टाने एका बलात्कार प्रकरणात आरोपी मुलाला जामीन देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचे सर्व तपशील तपासल्यानंतर हायकोर्टाने हा निकाल दिला. पीडित मुलीने जोपर्यंत त्यांच्यातील नातेसंबंध चांगले होते, तोपर्यंत कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्यानंतर तिने अन्याय झाल्याची तक्रार केली. या मुद्द्याकडे लक्ष वळवून हायकोर्टाने १८ वर्षीय आरोपीस जामीन मंजूर केला.

न्यायाधीश भारती डांगरे यांनी या प्रकरणावर निकाल देत असताना काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. पीडितेने तक्रार दाखल करण्याआधी दोघांमध्येही विनातक्रार संबंध प्रस्थापित झाले होते. याला दोघांचीही समंती होती. मात्र जी एफआयआर दाखल केलेला आहे, त्यानुसार दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

हिंदुस्तान टाइम्स या वेबसाईने याबद्दल बातमी दिली आहे. ७ जुलै रोजी मुंबई सायबर सेल विभागाने एका तरुणाला अटक केली होती. पीडित मुलीने याबाबतची तक्रार दिली होती. ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असताना तिची आणि आरोपी मुलाची ओळख झाली होती. दोघांच्याही ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यानंतर ते एकेमकांच्या घरी भेटण्यासाठी जाऊ लागले. दरम्यान एकेदिवशी घरी कुणीही नसताना त्यांच्यात शारीरिकसंबंध प्रस्थापित झाले.

“माझ्या इच्छेविरुद्ध बॉयफ्रेंडने शारीरिक संबंध ठेवले होते, यासाठी माजी संमती नव्हती, पण मी त्यावेळी तक्रार करु शकले नाही, असे पीडितेने पोलिसांना सांगितले. याचवर्षी जूनमध्ये या कपलमध्ये काही कारणास्तव भांडण झाले आणि त्यांनी ब्रेकअप केले. मात्र त्यानंतर बॉयफ्रेंडने पीडितेचे खासगी फोटो तिच्या आईला पाठविले. तसेच तिच्या इतर नातेवाईंकाना देखील हे फोटो पाठवणार आहे, अशी धमकी तिला दिली.

- Advertisement -

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या प्रकरणात निकाल देताना महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “अल्पवयीन मुले खूप जलदगतीने आणि चुकीच्या पद्धतीने या जगाचा अनुभव घेऊ इच्छित आहेत. एकमेकांना समजून घेण्याआधी आणि नाते भक्कम होण्याआधीच अपरिपक्व निर्णय घेत अल्पवयीन मुला-मुलींकडून शारीरिक संबंध ठेवले जातात. या प्रकरणातील आरोपीला संबंध ठेवण्याची घाई झाली होती, त्याची परिणीती आता तो बलात्काराचा आरोपी होण्यात झाली असून त्याच्यावर पोस्को सारखा गुन्हा दाखल झाला आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -