घरमुंबईपारा चढला, वातावरणाचा आणि राजकारणाचा!

पारा चढला, वातावरणाचा आणि राजकारणाचा!

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून महाड आणि परिसराचे वातावरणात सातत्याने बदल जाणवू लागला आहे. यावर्षी पुन्हा मार्च महिन्यातच सूर्य चांगलाच कोपला आहे. येथील तापमान जवळपास ४० अंश सेल्सिअसच्या वर जावू लागले आहे. यामुळे मानवी आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. त्यातच निवडणुका जसजशा जवळ येवू लागल्या आहेत तसा वातावरणाबरोबर राजकीय पारादेखील वाढू लागला आहे.

महाड, शेजारील माणगाव, खेड हे तिन्ही तालुके तसे पाहिले तर निसर्ग संपन्न, पण गेल्या काही वर्षात सातत्याने वाढलेली वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण, वाढते शहरीकरण आदी कारणांमुळे येथील तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. विविध प्रकल्पांकरीता येथील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे एकेकाळी थंड वाटणारा परिसर आता चाकरमनी लोकांनादेखील नकोसा झाला आहे. उन्हाळ्यातील वाढती रखरख त्रासदायक ठरत आहे. गेली दोन दिवसापासून महाड आणि परिसरातील तापमान अचानक वाढू लागले आहे. हे तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत आणि त्याहून अधिक वाढू लागले आहे. या वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहे. थंड पेय आणि एसी खरेदीकरिता दुकानांकडे लोकांची पावले वाळू लागली आहेत.

- Advertisement -

प्रचंड उन्हात बाहेर पडताना काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन डॉक्टर्स करीत आहेत. उन्हाळ्यात उन्हाळे लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, उलटी असा त्रास सुरु होतो. याबाबत डॉ. राहुल सुकाळे यांनी शक्यतो उन्हात जाणे टाळले पाहिजे शिवाय फ्रीज, कूलरमधील पाणी पिऊ नये यामुळे घसा, दात, आतडे यावर दुष्परिणाम होतात असा सल्ला दिला. शिवाय वाळ्याची जुडी पाण्यात टाकून हे पाणी प्यावे, उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी न पिणे, शक्यतो कोल्ड्रींक्स न घेता कैरी पन्हे, ताक, फळांचे रस, यावर भर द्यावा असा सल्ला दिला.

या वातावरणीय बदलाबरोबरच निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरणदेखील तापू लागले आहे. निवडणूक अर्ज दाखल करणे, सभा आदींमुळे राजकीय रंग चढू लागला आहे. ऐन कडक उन्हात निवडणुका आल्याने राजकीय सभा आणि प्रचारात अडथळे निर्माण झाले आहेत. भर दुपारी प्रचार करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. कदाचित यावर्षी राजकीय टोप्या सर्वत्र दिसून येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -