घरमुंबईठाण्यात लॉकडाऊनमध्ये कोपरीच्या प्रवेशद्वारावरच भाजी विक्रेत्यांचा बाजार!

ठाण्यात लॉकडाऊनमध्ये कोपरीच्या प्रवेशद्वारावरच भाजी विक्रेत्यांचा बाजार!

Subscribe

पोलिसांसमक्षच प्रशासनाचे आदेश पायदळी

ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच पूर्वेतील कोपरी विभागात एकही रूग्ण न सापडल्याने कोपरी हे ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. कोपरीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी त्या क्षेत्रांच्या सीमा बंद करण्यात आले. पण प्रशासनाचे हे आदेश पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी कोपरीत बघायला मिळाला. भाजीपाला विक्री बंद असतानाही कोपरीच्या प्रवेशद्वारावरच भाजी विक्रेत्यांनी बाजार भरला असून ग्राहकांनी गर्दी केली हेाती. पोलिसांच्या समक्ष हा प्रकार सुरू असल्याचे बघायला मिळाला.

ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने शासन प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. ठाणे मुंब्रा आणि कळवा या परिसरात कोरोनाबाधितांचे रूग्ण आढळून आले आहेत. लोकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. बाजारात गर्दी होते त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लॉकडाऊन कडक केले असून रस्त्यावर वाहने आणण्यास आणि जीवनावश्यक वस्तूंवरही निर्बंध आणले आहेत. शहरात प्रभाग समितीनिहाय ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत ते क्षेत्रफळ रेड झोन म्हणून घोषित करण्यात यावे. तसेच ज्या परिसरात एकही कोरोना बाधीत रूग्ण सापडलेला नाही ती क्षेत्रे ग्रीन झोन म्हणून घोषित करणे तसेच त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून त्या क्षेत्रांच्या सीमा बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

- Advertisement -

कोपरीत उडवला आदेशाचा फज्जा

कोपरीत एकही रूग्ण न सापडल्याने पालिकेने कोपरी हे ग्रीन झोन म्हणून घोषित केले आहे. कोपरीमध्ये बाहेरची व्यक्ती आत प्रवेश करू नये तसेच कोपरीमधील व्यक्ती बाहेर पडू नये यासाठी कोपरी गावच्या सीमा सील करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार घेण्यात आला. पण दोन दिवसानंतर या आदेशाचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

कोपरीचे सर्व प्रवेश रस्ते महापालिकेने बंद केले असतानाही कोपरीच्या प्रवेशद्वारावरच बाहेरील भाजी विक्रेत्यांचा सर्रासपणे बाजार भरला हेाता. ग्राहकांनीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवित भाजी खरेदीत मग्न होते. तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असतानाही अनेकांनी तोंडावर साधा रूमालही बांधला नव्हता. मात्र हा सगळा प्रकार पेालिसांसमक्ष सुरू होता. मात्र पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याने कोपरी ग्रीन झाेन आहे रेड झोनमध्ये येऊ नये यासाठी प्रशासनाचा आटापिटा सुरू आहे. पण केापरीवासिय प्रशासनाचे नियम पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.


लॉकडाऊन दरम्यान ‘चाइल्ड पोर्नोग्राफीचं प्रमाण वाढलं’- ‘आयसीपीएफ’चे निरीक्षण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -