घरताज्या घडामोडीCoronaVirus: तज्ज्ञ, डॉक्टर, नर्स आणि इतर कामगारांची रुग्णालयांमध्ये तात्पुरती भरती

CoronaVirus: तज्ज्ञ, डॉक्टर, नर्स आणि इतर कामगारांची रुग्णालयांमध्ये तात्पुरती भरती

Subscribe

अधिष्ठाता, उपायुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त यांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेतील डॉक्टर्स, नर्सेस तसेच तंत्रज्ञांना आता कोरोनाचा संसर्ग होऊन अनेक कर्मचारी बाधित झाल्याने ऐन युध्दाच्या वेळी हे प्रमुख शिलेदारच धारातीर्थ पडू लागल्याने अखेर महापालिका प्रशासन जागे झाले. त्यामुळे महापालिका रुग्णालयातील या सैनिकांना बळ देण्यासाठी वैद्यकीय आणि उपवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या नेमणूक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार अतिदक्षता विषयक तज्ज्ञ, डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वॉर्डबॉय आणि कामगार आदींच्या नेमणूका तात्पुरत्या स्वरुपात केल्या जाणार आहे. याबाबतचे अधिकारच आयुक्तांनी रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि अधिक्षकांना दिले आहेत.

‘कोरोना कोविड-१९’ विरोधात सुरू असलेल्या महापालिकेच्या लढाईला बळ मिळावे आणि हे युद्ध अधिक प्रभावीपणे लढता यावे, यासाठी मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये, इतर रुग्णालये इत्यादी ठिकाणी वैद्यकीय आणि उप वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मंगळवारी दिले आहेत. या तात्पुरत्या स्वरूपातील नेमणुकांमध्ये अतिदक्षता विषयक तज्ज्ञ, डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वॉर्डबॉय आणि कामगार इत्यादी पदांचा समावेश आहे‌.

- Advertisement -

विविध पदांवर तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करण्याचे अधिकार संबंधित अधिष्ठाता, उपायुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, सहाय्यक आयुक्त इत्यादींना महापालिका आयुक्तांनी बहाल केले आहेत. यानुसार या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राची गरज लक्षात घेऊन आणि अर्जदाराकडे आवश्यक ती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असल्याची खात्री झाल्यानंतर नेमणुका करावयाच्या आहेत. त्यांना योग्य मानधन दिले जाणार आह. तसेच या मानधनावर केला जाणारा खर्च हा ‘कोरोना’ विषयक तरतुदींमधून करण्याचें निर्देशही महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत

तात्पुरत्या नेमणुकांसाठी दिले जाणारे मासिक मानधन

अतिदक्षता विषयक तज्ज्ञ :  दीड ते दोन लाख रुपये

- Advertisement -

एम.बी.बी.एस. डॉक्टर असल्यास :  ८० हजार रुपये

बी.ए.एम.एस. असल्यास :  ६० हजार रुपये

बी.एच.एम.एस. डॉक्टर :  ५० हजार रुपये

परिचारिकांना, प्रयोगशाळा तंत्रज्ञांना आणि इतर तंत्रज्ञ : ३० हजार रुपये

वॉर्डबॉय, कामगार  :  २० हजार  रुपये


हेही वाचा – ग्रीन झोनमधल्या १० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होऊ शकतो!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -