घरमुंबईघाटकोपरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, पतीला अटक

घाटकोपरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, पतीला अटक

Subscribe

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घाटकोपरमध्ये समोर आली आहे.

घाटकोपर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर पळून गेलेला आरोपी पती सचिन दळवी याला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिनवर त्याची पत्नी तृप्ती सचिन दळवी (२७) हिची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घाटकोपर येथील रामनगर, रायगड विभाग सहकारी सोसायटीमध्ये घडली.

भांडणामुळे केली हत्या!

सोसायटीच्या कांबळे चाळीत सचिन हा त्याची पत्नी तृप्ती आणि मुलांसोबत राहत होता. तो सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. काही दिवसांपासून तो तृप्तीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरुन पती-पत्नीममध्ये वाद सुरु होते. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता या दोघांमध्ये पुन्हा प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर त्याने तृप्तीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो मुलांना घेऊन तेथून निघून गेला होता. हा प्रकार सकाळी दहा वाजता स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी पार्कसाईट पोलिसांना ही माहिती दिली.

- Advertisement -

आरोपी पतीला पोलीस कोठडी

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तृप्तीला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात तिची हत्या गळा आवळून झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तृप्तीचा भाऊ राजेश हरिश्चंद्र मोरे यांच्या तक्रारीवरुन पार्कसाईट पोलिसांनी आरोपी पती सचिन दळवीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. हत्येनंतर सचिन हा पळून गेला होता. अखेर त्याला काही तासांत पोलिसांनी घाटकोपर परिसरातून शिताफीने अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -