मी देवाचा अवतार नाही, चमत्कारी बाबाही नाही; धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा यु-टर्न

मी कुठला देवाचा अवतार नाही किंवा मी कुठलाच जादूटोणा करत नाही आणि चमत्कार करत नाही, मात्र मी हिंदू धर्मासाठी काम करणार आहे. मी समाजासाठी काम करणार, असे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी शनिवारी म्हटले.

मी कुठला देवाचा अवतार नाही किंवा मी कुठलाच जादूटोणा करत नाही आणि चमत्कार करत नाही, मात्र मी हिंदू धर्मासाठी काम करणार आहे. मी समाजासाठी काम करणार, असे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी शनिवारी म्हटले.

मीरारोड येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार जिल्हा छतरपूर (मध्य प्रदेश) यांचा दिव्यदर्शन कार्यक्रम शनिवारी पार पडला. या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अनिस) केली होती. कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला होता.

त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पासधारकांनाही काही वेळासाठी कार्यक्रमात सोडले जात नसल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. तसेच, पोलिसांनी अगोदरच कार्यक्रम आयोजकांना तंबी दिल्यामुळे त्याठिकाणी कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही.