घरमुंबईआयडॉलच्या परीक्षेत गोंधळ खपवून घेणार नाही : मनविसेचा इशारा

आयडॉलच्या परीक्षेत गोंधळ खपवून घेणार नाही : मनविसेचा इशारा

Subscribe

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. ही बाब लक्षात घेतला परीक्षेत पुन्हा गोंधळ झाल्यास आपच्या स्टाईलने विद्यापीठाचा समाचार घेऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या परीक्षेला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. ऑनलाईन होणार्‍या या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. ही बाब लक्षात घेतला परीक्षेत पुन्हा गोंधळ झाल्यास आमच्या स्टाईलने विद्यापीठाचा समाचार घेऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे.

आयडॉलमधून शिक्षण घेणार्‍या बीए आणि बीकॉमच्या ऑनलाईन परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रंचड गोधळ उडाला. ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी लॉगिन आयडी व पासवर्डची लिंक न आल्याने विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये धाव घेतली. मात्र विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी तेथे संचालक व उपसंचालक यांच्यापैकी कोणीच उपस्थित नव्हते. परीक्षाकाळात विद्यापीठासाठी ही बाब अशोभनीय असल्याचे सांगत मनविसेकडून याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच या पुढे होणार्‍या परीक्षेत कोणताही गोंधळ होणार नाही. याची शाश्वती विद्यापीठाने द्यावी, अशी मागणी मनविसेकडून करण्यात आली.

- Advertisement -

ऑनलाईन परीक्षा घेण्याचे काम विद्यापीठाने ज्या कंपनीला दिले आहे. त्यांच्याकडे ऑनलाईन परीक्षा घेण्याचा अनुभव नाही. त्यामुळे यापुढे असा गोधळ झाल्यास हा करार करणार्‍या विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल आणि विद्यापीठाचा समाचार मनविसे स्टाईलने घेण्यात येईल, इशाराही मनविसेचे विद्यापीठ अध्यक्ष अ‍ॅड. संतोष धोत्रे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -