घरमुंबईपाणी शुद्धीकरणासंदर्भात आयआयटी करणार संशोधन

पाणी शुद्धीकरणासंदर्भात आयआयटी करणार संशोधन

Subscribe

देशाच्या विविध भागांतील पाण्याचा सर्व्हे करणार

देशातील विविध ठिकाणी स्थानिकांकडून पाणी शुद्धीकरण करण्यासंदर्भात वापरण्यात येणार्‍या प्रक्रियांबाबत आयआयटी बॉम्बेकडून अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी बॉम्बेकडून ‘वॉटर इनोेव्हेशन सेंटर : टेक्नोलॉजी, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन’ (डब्ल्यूआयसीटीआरई) सेंटर सुरू करण्यात आले आहे. पाणी शुद्धीकरणासंदर्भातील अभ्यास व संशोधनासाठी आयआयटी बॉम्बेबरोबरच आयआयटी हैदराबाद, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ गांधीनगर या संस्था एकत्र काम करणार आहेत. डब्ल्यूआयसीटीआरईकडून करण्यात येणार्‍या संशोधनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञांन मंत्रालयाकडून निधी पुरवण्यात येणार आहे.

देशातील विविध विभागांमध्ये सामाजिक गरज म्हणून पाणी शुद्धीकरणासंदर्भात विविध स्तरावर डब्ल्यूआयसीटीआरईकडून संशोधन करण्यात येणार आहे. शैक्षणिक व औद्योगिक भागीदारीमध्ये हे संशोधन करण्यात येणार आहे. पाण्यात मिश्रित संयुगे, पाण्याचे साठे, पाण्याचे शुद्धीकरण अशा विविध बाबींवर यामध्ये संशोधन करण्यात येणार आहे. यासाठी विविध संस्थांशी करार करण्यात येणार आहे. डब्ल्यूआयसीटीआरई केेंद्राची उद्घाटन आयआयटी बॉम्बेचे प्रो. देवांग व्ही. खखर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

- Advertisement -

औद्योगिक आणि सामाजिक गरजेनुसार पाणी शुद्धीकरणासंदर्भात डब्ल्यूआयसीटीआरई रास्त पर्याय शोधले असा विश्वास प्रो. खखर यांनी यावेळी व्यक्त केला. वेगाने घडणारे औद्योगिकरण, वाढती लोकशाही यामुळे निर्माण होणार्‍या पाण्याच्या टंचाईच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी जगभरात विविध प्रयोग केले जातात. आयआयटी बॉम्बेकडूनही नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी यावर सातत्याने नवनवीन संशोधन सुरू आहे, असे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. संजय वाजपेयी यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -