घरमुंबईनायरमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत होणार वाढ

नायरमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत होणार वाढ

Subscribe

महापालिकेच्या हॉस्पिटल्समधील पारंपरिक शस्त्रक्रिया कक्षामुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत अनेक अडचणी येत असत. तसेच अन्य शस्त्रक्रियांच्या रुग्णांनाही वाट पहावी लागत असे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष सोमवारपासून सुरू करण्यात आला.

महापालिकेच्या हॉस्पिटल्समधील पारंपरिक शस्त्रक्रिया कक्षामुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत अनेक अडचणी येत असत. तसेच अन्य शस्त्रक्रियांच्या रुग्णांनाही वाट पहावी लागत असे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष सोमवारपासून सुरू करण्यात आला. या अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षामुळे शस्त्रक्रिया लवकर व सुरक्षित होतात. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत दुपटीने वाढ होणार आहे, अशी माहिती नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

नायर हॉस्पिटलमध्ये विविध विभागांमध्ये शस्त्रक्रिया कक्ष आहेत. या शस्त्रक्रिया कक्षांपैकी लहान मुलांच्या दुर्धर शस्त्रक्रिया व मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियेसाठी असलेल्या शस्त्रक्रिया कक्षाचे नूतनीकरण करून त्याजागी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात आले आहेत. या शस्त्रक्रिया कक्षाच्या भिंती व छत स्टेनलेस स्टीलपासून बनवले असून, त्यावर जंतूप्रतिबंधक रंग लावला आहे. त्यामुळे हे शस्त्रक्रिया कक्ष जंतूप्रतिबंधक, बुरशीप्रतिबंधक आणि धूळ प्रतिबंधक आहे. परिणामी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णास जंतूसंसर्गाची शक्यता कमी आहे.

- Advertisement -

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या दुर्धर शस्त्रक्रिया यासारख्या संवेदनशील शस्त्रक्रियांसाठी ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ उपयुक्त ठरते. नायरमध्ये दरवर्षी 12 ते 14 प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. मात्र मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्षामुळे त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. भारमल यांनी दिली.  मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन, केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, आरोग्य विभागाचा उपायुक्त सुनिल दामणे, नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, उप अधिष्ठात्री डॉ. पंकजा आगल व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

२०१७ – १८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात महापालिकेच्या केईएम, नायर व सायनमधील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये पाच ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार नायरमध्ये लहान मुलांच्या शस्त्रक्रिया व मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी असलेल्या शस्त्रक्रिया कक्षाचे रुपांतर जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्षात केले आहे. यासाठी ७ कोटी खर्च करण्यात आला आहे.

- Advertisement -

मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे वैशिष्ठ्ये
मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्षामध्ये हवा शुद्ध करणार्‍या अत्याधुनिक यंत्राबरोबरच विद्युत यंत्रणा, विद्युत जोडणी, तसेच गॅस पुरवठा जंतू प्रतिबंधक पद्धतीने बनवल्याने जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक दिवे, दरवाजे, ऑपरेशन कंट्रोल पॅनल, क्ष-किरण यंत्रणा, ऑपरेशन टेबल अत्याधुनिक आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे ‘प्री-फॅब्रीकेटेड’ पद्धतीचे असल्याने ते सहज सुरू करणे शक्य आहे.

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -