घरCORONA UPDATEमुंबईत लॉकडाऊन अधिक कडक; मुंब्रा परिसरात SRPF च्या तुकड्या तैनात

मुंबईत लॉकडाऊन अधिक कडक; मुंब्रा परिसरात SRPF च्या तुकड्या तैनात

Subscribe

मुंब्रा हा ठाण्यातील पहिला परिसर ठरला ज्या ठिकाणी नागरिकांना पायबंद घालण्यासाठी एसआरपीची तुकडी तैनात करण्यात आली.

घरात बसा, महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका, या जनजागृतीला आणि संदेशाला बगल देत मुंब्रात बेलगामपणे बाजारहाट करणे, वावरणे सुरु होते. घराच्या बाहेर मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांना मज्जाव करणाऱ्या पोलिसांना गुंगारा देत मुंब्रावासी राजरोसपणे वावरत होते. यालाच पायबंद घालण्यासाठी अखेर जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळीच १०० जणांची राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करून मुंब्रामधील भटकंती करणाऱ्यांची नाकाबंदी केली. मुंब्रा हा ठाण्यातील पहिला परिसर ठरला ज्या ठिकाणी नागरिकांना पायबंद घालण्यासाठी एसआरपीची तुकडी तैनात करण्यात आली.

मुंब्रा परिसरात शासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या लोकांना आता जबर बसवण्यासाठी १०० जणांची एसआरपीची एक तुकडी यांच्या सोबतच मुंब्रा पोलीस ठाण्याचे १६० अधिकारी, कर्मचारी आणि २३ होमगार्ड असा ताफा आता मुंब्र्यावर नियंत्रण मिळवणार आहे. मुंब्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे रस्त्यावर उतरण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) ला पाचारण करण्यात आले आहे. एसआरपीएफची कुमक शहरात उपलब्ध झाल्याने नागरिकांना सक्तीने घरी बसण्यास भाग पडेल. स्थानिक पोलीस ठाण्याच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना यामुळे मदतीचा हात मिळेल, असे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Coronvirus: कोरोनाचा राज्यात आकडा २२०, तर एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

एसआरपीएफचे जवान उपलब्ध झाल्याने परिस्थिती हाताळण्यात अधिक सुकर जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंब्रामध्ये संचारबंदीमध्ये देखील नागरिक रस्त्यावर फिरण्याचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पोलिसांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ अन्वये ४० वाहने जप्त करण्यात आली असून ७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एसआरपीएफची एक तुकडी मुंब्रामध्ये तैनात करण्यात आली असल्याची माहिती एसआरपीएफ, गट क्रमांक ११, नवी मुंबई कमांडट सचिन पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -