मुंबईत ७०० झाडे आणि फांद्या यांची छाटणी बाकी; पावसाळ्यात धोका उद्भवण्याची शक्यता

mumbai tree

मुंबईत पावसाळ्यात झाड, फांद्या पडून दुर्घटना घडू नये यासाठी, पालिका प्रशासन पावसाळयापूर्वीच धोकादायक झाडे, झाडांच्या फांद्या हटविण्याचे, त्यांची छाटणी करण्याचे काम स्वतःच्या हद्दीत करून घेते. मात्र, त्या बरोबर खासगी सोसायटयांनाही धोकादायक झाडे/ फांद्या हटविण्याचे आदेश दिले होते. पण ९ हजार खासगी सोसायटयांपैकी ८,३०० ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याची माहिती पालिका उद्यान खात्याकडून देण्यात आली आहे.त्यामुळे आगामी काळात पावसाळ्यात सदर धोकादायक ७०० झाडे/ फांद्या यांची पडझड होऊन एखादी दुर्घटना घडल्यास व त्यामुळे एखादी जीवित हानी झाल्यास अथवा कोणी गंभीर जखमी झाल्यास प्रशासनाकडून संबंधित सोसायटीविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबईत पावसाळ्यात झाडे/ फांद्या कोसळून दुर्घटना घडतात. त्यामध्ये जीवित हानी होते. तर कधी कधी त्यामुळे कोणी व्यक्ती कमी – अधिक प्रमाणात जखमी होते तर कधी कायमस्वरूपी दिव्यांग होते. तर कधी कधी झाडे, फांद्या पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे या दुर्घटना व त्यात होणारी हानी टाळण्यासाठी पालिकेने धोकादायक झाडांच्या छाटणीचे काम हाती घेतले. स्वतःच्या हद्दीतील धोकादायक झाडे/ फांद्या हटविण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली. मात्र पालिकेने ज्या ९ हजार धोकादायक सोसायटयांना त्यांच्या हद्दीतील झाडे,फांद्या हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, सदर सोसायटयांनी ९ हजार पैकी ८,७०० झाडे/ फांद्या यांच्याबाबतीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण या सोसायटयांनी ३०० झाडे/ फांद्या यांच्यावरील कारवाई प्रलंबित ठेवली आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ३० लाख वृक्ष आहेत. त्यापैकी मान्सूनपूर्व कामांतर्गत १५ जूनपर्यंत सर्व झाडांची पाहणी करून मृत व धोकादायक वृक्षाची छाटणी/ कापणी करण्यात आलेली आहे. ३० लाख वृक्षांपैकी १,९२ हजार झाडे मुंबई महापालिकेच्या रस्त्यावर आहेत. त्यापैकी दिड लाख वृक्षांची छाटणी/ कापणी करण्यात आली आहे. तर यात एकूण ५२३ झाडे मृत/धोकादायक स्थितीत होती, जी मान्सुनपूर्व काढण्यात आलेली आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून ९ हजार सोसायटींना आपआपल्या सोसायटीतील झाडांची छाटणी/ कापणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. पालिकेच्या आदेशानंतर ९ हजार सोसायटयांपैकी ८३०० सोसायटींनी सोसायटीतील झाडांची कापणी/छाटणी करून घेतली आहे.

मुंबईकरांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील / सोसायटीमधील मृत व धोकादायक वृक्ष असल्यास स्थानिक विभाग कार्यालयातील उद्यान अधीकान्यांशी संपर्क साधून त्याची कापणी / छाटणी करुन घ्यावी. जेणे करुन अतिवृष्टीच्या काळात कोणतीही वित्त व जिवीतहानी होणार नाही. तसेच नागरीकांनी पाऊस व सोसाट्याचा वारा सुरु असताना झाडाखाली उभे राहू नये व अतिवृष्टीच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नते म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका उद्यान अधिक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी केले.