घरमुंबईमागील दोन वर्षांच्या तुलनेत मुंबईत यावर्षी गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ; मात्र मृत्यूदर...

मागील दोन वर्षांच्या तुलनेत मुंबईत यावर्षी गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ; मात्र मृत्यूदर कमी

Subscribe

स्वाईन फ्ल्यूने आतापर्यंत दोन रुग्णांचा बळी गेला आहे. 2020 व 2021 मध्ये स्वाईन फ्ल्यूचे अनुक्रमे 44 व 64 रुग्ण आढळून आले होते.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी 1 जानेवारी ते 16 ऑक्टोबर या कालावधीत म्हणजे अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत स्वाईन फ्ल्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ यांच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. विशेषतः स्वाईन फ्ल्यूचे ३२५ रुग्ण आढळून आले आहेत. तर स्वाईन फ्ल्यूने आतापर्यंत दोन रुग्णांचा बळी गेला आहे. 2020 व 2021 मध्ये स्वाईन फ्ल्यूचे अनुक्रमे 44 व 64 रुग्ण आढळून आले होते.

तसेच, यावर्षी गॅस्ट्रोचे 4,584 रुग्ण आढळून आले आहेत. तर त्या तुलनेत 2020 व 2021 मध्ये गॅस्ट्रोचे अनुक्रमे 2,549 व 3,110 रुग्ण आढळून आले होते. त्याचप्रमाणे, यंदा कावीळने पिडीत रुग्णांची संख्या 457 नोंदविण्यात आली आहे. 2020 व 2021 मध्ये कावीळचे अनुक्रमे 263 व 308 रुग्ण आढळून आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

त्याचप्रमाणे यावर्षी लेप्टोने बाधित रुग्णांची संख्या 241 एवढी नोंदविण्यात आली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 2020 मध्ये लेप्टोचे अनुक्रमे 240 रुग्ण आणि 8 रुग्णांचा मृत्यू तर 2021 मध्ये लेप्टोचे 224 रुग्ण आढळून आले व 6 जणांचा मृत्यू झाला होता.

दोन वर्षांच्या तुलनेत यंदा 50 टक्के कमी मृत्यू

- Advertisement -

2020 मध्ये मलेरिया -1, लेप्टो – 8, डेंग्यू – 3 अशा 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 2021 मध्ये मलेरिया -1, लेप्टो – 6, डेंग्यू – 5 व कावीळने -1 अशा 13 रुग्णांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये मलेरिया -1, लेप्टो – 1, डेंग्यू – 2 तर स्वाईन फ्ल्यूचे 2 अशा 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा 50 टक्के कमी मृत्यू झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -