घरमुंबईथंडीमुळे श्वसनविकारात वाढ

थंडीमुळे श्वसनविकारात वाढ

Subscribe

मुंबई आणि मुंबईलगतच्या ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यात झपाट्याने वाढलेले औद्योगिकरीकरण, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाढत असलेली प्रचंड संख्या त्यातून कार्बन उत्सर्जनामुळे वातावरणातील प्रदूषण प्रचंड वाढल्याने त्याचा विपरित परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे.

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिना अर्धा संपूनही थंडीचा मोसम अजूनही संपलेला नाही. सकाळी गार वारे आणि दुपारी असह्य होणारा उकाडा अशा वेगळ्याच कात्रीत सध्या नागरिक सापडले आहेत. मुंबई आणि मुंबईलगतच्या ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यात झपाट्याने वाढलेले औद्योगिकरीकरण, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाढत असलेली प्रचंड संख्या त्यातून कार्बन उत्सर्जनामुळे वातावरणातील प्रदूषण प्रचंड वाढल्याने त्याचा विपरित परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे. हवेत आढळणाऱ्या धूर, प्लास्टिक आणि इतर वस्तुंचे सुक्ष्म कण, प्रदूषणामुळे दमा आणि श्वसन विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

प्रदूषणाचा श्वसनयंत्रणेवर परिणाम 

याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे चेस्ट फीजिशियन (फुफ्फुस विकारतज्ञ) डॉ. पार्थीव शहा सांगतात, ‘थंडीत वातारणातील प्रदूषणाचा सर्वाधिक वाईट परिणाम श्वसनयंत्रणेवर होतो. वातावरणातील धुळ, धूर, प्लास्टिक, सल्फेट नायट्रेट, कार्बन मोनॉक्साईड, ब्लॅक कार्बन यांचं २.५ मायक्रॉन पेक्षा कमी आकाराचे कण श्वासोच्छवासाद्वारे श्वसन नलिकेत प्रवेश करतात आणि आतील नाजूक त्वचेला इजा पोहोचवतात. यालाच क्रॉनिक ब्रॉन्कायटीस किंवा सीओपीडी म्हणतात. थंडीच्या दिवसांत वातावरणातल्या थंडाव्यामुळे हवा लवकर वर जात नाही. त्यामुळे हवेत धुळीचे कण, धूळ तसंच हवेतून पसरणाऱ्या विविध रोगांचे जंतू वाढतात. ते श्वासावाटे फुफ्फुसात प्रवेश करतात. आधीच वातावरणातील कोरडेपणामुळे श्वसनवाहिन्यांना कोरडेपणा येतो. त्यामुळे त्या आकुंचन पावतात. आकुंचलेल्या श्वसनवाहिन्यांत रोगजंतू शिरल्यामुळे दम्याच्या रुग्णांना जास्तच त्रास होतो.’

- Advertisement -

लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी

बदलत्या वातावरणाचा त्रास लहान मुलांवरही होत आहे. त्यातून सर्दी, खोकला, कफ असे आजार बळावले आहेत. लहान मुलांची श्वसनप्रक्रिया खूप नाजूक असते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारचा तात्काळ संसर्ग या मुलांना होऊ शकतो. याचा सर्वात जास्त त्रास नाक-कान-घसा या अवयवांना होतो. त्यामुळे लहान मुलांना सतत सर्दी होणे, खोकला लागणे, नाकातून पाणी येणे, घसा खवखवणे, घशाला सूज येणे, कानातून पाणी होणे अशा समस्या उद्भवत आहेत.

१० मुलांपैकी एकाचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सरासरी १० मुलांपैकी एका मुलाच्या मृत्युचे कारण हे वायू प्रदूषण असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आत्तापासून ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे, असे मत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरच्या तज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्त केले.

- Advertisement -

हेही वाचा –

वायू प्रदुषणाचा विळखा

दिवाळीत वायू प्रदुषणाने गाठली धोक्याची पातळी!

बांधकामांमुळे कल्याण डोंबिवलीत ‘स्मार्ट’ प्रदुषण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -