Thursday, June 10, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई कोरोना काळात अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ; पालिका शोध घेऊन कारवाई करणार - महापौर

कोरोना काळात अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ; पालिका शोध घेऊन कारवाई करणार – महापौर

Related Story

- Advertisement -

मुंबईतल्या मालाडमधल्या मालवणी भागात इमारत कोसळून ११ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत. यावर भाष्य करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दुःख व्यक्त केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मात्र, त्यांचा शोध घेऊन महापालिका त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करणार आहे, असं महापौर यांनी सांगितलं.

मालाड दुर्घटनेची जबाबदारी कुणाची हे सांगताना दुख होतं. महानगर पालिका, बीपीटी आणि इतर विभागांची बैठक घेतली होती. जबाबदारीतील प्रशासनाने आपली कामे निट केली तर ही वेळ येणार नाही. काय त्या निष्पाप लोकांची चूक आहे. ज्यांचा या दुर्घटनेच मृत्यू झाला. सी कॅटिगिरी इमारतीची घोषणा झाल्यानंतर नागरिकांना तातडीने हलवायला हवं. या पुढे या घटनांना डोळसं पणे पाहणं गरजेचं आहे. या घटनेमुळे आमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे. प्रत्येकाने गांभीर्याने लक्ष घातलं तर अशा घटना घडणार नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

भाजप भोभो करत राहिल, ते काय दुध के धुले आहेत का?  अनधिकृत बांधकामांबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ही होते. कोर्टाचे आदेश असल्याने कारवाई थांबली आहे. मात्र आता ठोस कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर यांनी दिला. या घटनांनंतर पालिकेच्या वार्ड ऑफिसरला प्रत्येक वार्डातील डीओला अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल. अनधिकृ बांधकामांना बाबीत राजकिय हस्तक्षेप करायला नको, असं पेडणेकर म्हणाल्या.

कालचा पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी  मोठ्या प्रमाणात  पाऊस होता. हा पाऊस १५० मिमीच्या वर होता. या पावसात सात ते आठ तास कर्मचारी काम करत होते. मात्र पाणी बाहेर फेकले जात नव्हते. जे पाणी पाच पाचसदिवस तुंबायचे, वाहतुकीचा खोळंबा व्हायचा. मात्र काल ज्या ठिकाणी कंबरेभर तुंबते त्या ठिकाणी गुडघाभर पाणी होते. हिंदमाता येथे न्यायालयातील लढाईत २८ दिवस वाया गेले. मात्र ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे. संपूर्ण मुंबईत ४७५ पंप लावण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची उंची वाढलेली आहे. त्यामुळे इमारती परिसरात सखोल भाग झाला आहे, असं महापौर म्हणाल्या. Ki

- Advertisement -