घरमुंबईभारतीय व्यवसायिकांचे परदेशात अपहरण

भारतीय व्यवसायिकांचे परदेशात अपहरण

Subscribe

दोन व्यवसायीक भावांच्या अपहरणाच्या घनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून करण्यात आली सुटका.

व्यवसायानिमित्त परदेशात गेलेल्या दोन भारतीय भावांचे अपहरण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आंतराष्ट्रीय स्तारावर भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्यांची सुटका करण्यात आली. मलेशिया पोलिसांनी दोन्ही भावांची अपहरणकर्त्यांकडून सुटका केली. अद्याप हे दोन्ही भाऊ मलेशियात असून या बाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. रोहन (३६) आणि कौस्तुभ प्रकाश वैद्य (३१) असे या भावांची नावे आहेत.

डोबिवली येथे रहाणारे हे दोन्ही भाऊ मागील काही वर्षांपासून ते एक फूड्स कंपनी चालवतात. ही कंपनी मांस निर्यातीचे काम करते. व्यवसाया निमीत्त त्यांना मलेशिया, थायलं आणि व्हिएतनाम देशात जावे लागते. मलेशियातील एका खाजगी कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर पुढील बोलणी करण्यासाठी हे दोघे १ ऑगस्ट रोजी मलेशियाला गेले होते. मलेशियात पोहचल्यावर त्याच दिवशी त्यांचे अपहरण करण्यात आले. घटनेनंतर अपहरणकर्यांनी डोंबिवलीला त्यांच्या राहत्याघरी फोन करुन एक कोटीची खंडणी मागीतली. तेव्हा घरच्यांमध्ये भितीचे वातावरण होते. मात्र यांच्या वडिलांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी तातडीने भारतीय दूतावासाला तातडीने संपर्क साधला.

- Advertisement -

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितले की, “वैद्य यांच्या सुटकेसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने मलेशिया दूतावासाला संपर्क साधला. या प्रकरणी मलेशिया पोलिसांनी तक्रार नोंदवून या अपहरण कर्त्यांचा शोध घेऊन यादोघांची सुटका केली. कालच आम्हाला या माहितीला मलेशियन पोलिसांनी दुजोरा दिला आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -