घरमनोरंजनअभिनेता रिचर्ड गेरे होणार ६८ व्या वर्षी बाबा

अभिनेता रिचर्ड गेरे होणार ६८ व्या वर्षी बाबा

Subscribe

शिल्पा शेट्टीला स्टेजवर किस करून चर्चेत आलेला हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेरे वयाच्या ६८ व्या वर्षी बाबा होणार आहे. रिचर्डनं एप्रिल २०१८ मध्ये अलजेंड्रा सिल्वाबरोबर तिसरं लग्न केलं असून आता त्यानं ही खुशखबर दिली आहे. जवळपास तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केलं. अलजेंद्रानं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. सिल्वा ही रिचर्डची तिसरी पत्नी असून पहिल्या दोन्ही पत्नीपासून रिचर्ड विभक्त झालेला आहे.

- Advertisement -

 

शिल्पा शेट्टीला सर्वांसमोर केलं होतं किस

काही वर्षांपूर्वी जयपूरमध्ये एड्स अवेअरनेससाठी रिचर्ड गेरे आला होता. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीनंदेखील उपस्थिती लावली होती. त्याचवेळी स्टेजवर शिल्पाला मिठी मारून रिचर्डनं किस केलं होतं. त्याकाळी हे प्रकरण खूप गाजलं होतं. या दोघांवर यासाठी अश्लीलपणा पसरवण्याबद्दल केसदेखील दाखल करण्यात आली होती. पण त्यानंतर रिचर्ड पुन्हा कधीही रिचर्डच्या अशा कोणत्या बातम्या समोर आल्या नाहीत.

- Advertisement -

सिल्वा आहे ३३ वर्षांनी लहान

रिचर्डची तिसरी पत्नी सिल्वा ही त्याच्यापेक्षा साधारण ३३ वर्षांनी लहान आहे. सिल्वाचं वय ३५ आहे तर रिचर्डचं वय सध्या ६८ वर्ष इतकं आहे. सिल्वाचंदेखील हे दुसरं लग्न असून तिचं पहिलं लग्न गोविंद फ्रेडलँडबरोबर झालं होतं. तर रिचर्डची पहिली पत्नी सिंडी क्रॉफर्ड ही हॉलीवूडची सुपरमॉडल होती. त्यांचं लग्न केवळ ५ वर्ष टिकलं. यानंतर रिचर्डनं कॅरी लोवेलसोबत लग्न केलं, जे १५ वर्ष टिकलं. कॅरी आणि रिचर्डला एक १८ वर्षांचा होमर नावाचा मुलगा आहे. सध्या सिल्वा आणि रिचर्ड आपल्या संसारात सुखी असून लवकरच सिल्वा बाळाला जन्म देणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -