घरCORONA UPDATEकेडीएमसीत उपायुक्तासह कर्मचारी कोरोनाची लागण; नवीन ३१ रूग्णांची नोंद

केडीएमसीत उपायुक्तासह कर्मचारी कोरोनाची लागण; नवीन ३१ रूग्णांची नोंद

Subscribe

महापालिकेतील आरोग्य विभागातील डॉक्टरानंतर आता उपायुक्त दर्जाच्या अधिकारी आणि एका शिपायाला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन ३१ रूग्णांची नोंद झाली, त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ९४२ वर पोहोचली आहे. महापालिकेतील आरोग्य विभागातील डॉक्टरानंतर आता उपायुक्त दर्जाच्या अधिकारी आणि एका शिपायाला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे.

शहरात रोजच्या रोज कोरोनाबाधित रूग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली असतानाच आता पालिकेतही कोरोनाने शिरकाव केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. २० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून उपायुक्त दर्जाच्या अधिकारी आणि एका शिपायाच्या अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे ते अधिकारी व कर्मचारी कोणाच्या संपर्कात आले याचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. यापूर्वी रूक्मिणीबाई रूग्णालयातील भूलतज्ञाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. मात्र, त्यांच्या संपर्कातील लोकांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, आनंदवाडी, कोळसेवाडी विठ्ठलवाडी तिसगाव नेतीवली चक्कीनाका, लोकधारा परिसरात १७ रूग्ण, कल्याण पश्चिमेतील भारताचौक, वायलेनगर ठाणगेवाडी गांधारी मिलींद नगर परिसरात ६ रूग्ण, डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर आणि दिनदयाळ क्रॉस रोड या परिसरात २ रूग्ण, डोंबिवली पूर्वेत पाथर्ली गाव, नांदिवली रोड, गणेशनगर आणि सावरकररोड या परिसरात ४ रूग्ण तर ठाकुर्ली खंबाळपाडा येथे १ रूग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रूग्णांची संख्या ३२६ असून सध्या ५८९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -