घरताज्या घडामोडीमंत्रालयातील इंटरनेट सेवा तीन तास ठप्प

मंत्रालयातील इंटरनेट सेवा तीन तास ठप्प

Subscribe

मंत्रालयाच्या सर्व्हरमध्ये मंगळवारी अचानक तांत्रिक झाल्याने त्याचा परिणाम विविध विभागांची कार्यालये आणि इंटरनेट सेवेवर झाला. मंदगतीने चालणार्‍या इंटरनेट तसेच सर्व्हरमुळे अनेक कामे रखडली. अखेर तीन तासानंतर संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. मंत्रालयातील इंटरनेट सेवा दुपारी दीड वाजल्यापासून बंद झाली होती. संपूर्ण काम यामुळे ठप्प झाले होते. यानंतर संबंधित यंत्रणा ही सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागली. दुपारी साडेचारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -