घरमुंबईIqbal Singh Chahal : गोखले पूलात कोणतीही चूक नाही; आयुक्तांनी सर्व आरोप...

Iqbal Singh Chahal : गोखले पूलात कोणतीही चूक नाही; आयुक्तांनी सर्व आरोप फेटाळले

Subscribe

मुंबई : अंधेरी येथील गोखले पुलावरून सध्या मुंबई महापालिकेवर चौफेर टीका करण्यात येत आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीतील अपयशाला जबाबदार असलेले पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. अशातच आता इकबाल सिंह चहल यांनी गोखले पुलासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. (Iqbal Singh Chahal There is nothing wrong with Gokhale Pool The commissioner denied all the allegations)

हेही वाचा – Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंसारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम शिंदेंनी केलं – रामदास कदम

- Advertisement -

इकबाल सिंह चहल म्हणाले की, जेव्हा गोखले पूलाचं काम आमच्याकडे आलं तेव्हा ते पूर्ण झालं होतं. मला काहीच लिखित सांगण्यात आले नाही की, रेल्वेची पॉलीसी बदलली आहे आणि 2 मीटर उंचावर पूल बांधायचा आहे. त्यामुळे या गोष्टीला चूक कसं म्हणायचं. त्यामुळे जी खरी माहिती आहे ती नागरिकांपर्यंत पोहचवली तर सोशल मीडियावरील चुकीची माहिती पसरवणं बंद होईल. याचवेळी त्यांना आदित्य ठाकरेंनी यांनी तुमच्या निलंबणाची मागणी केली आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, मला राजकाणात पडायचे नाही, पण माझी जबाबदारी आहे की, पालिका आयुक्त म्हणून आणि सरकारी अधिकारी म्हणून जी खरी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहचवायची आहे.

आदित्य ठाकरेंच्या आरोपावर बोलताना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, डीलाय रोड आदित्य ठाकरे यांनी सात वर्षांपूर्वी सुरू केला होता. आता तो पांढरा हत्ती झाला आहे. परंतु दुसरीकडे गोखले पूल महानगर पालिकेने 14 महिन्याच्या आत पूर्ण केला. हा जागतिक विक्रम आहे. गोखले पूल पूर्ण झाला असून तो नागरिकांच्या सेवेत आहे. यासाठी प्रशंसा न करता फक्त टीका करायची. 14 महिन्यांच्या आत गोखले पूर्ण केला आहे. मोठा गर्डर टाकला आहे, तीन मिनिटांनी रेल्वे येत असतानाही महानगरपालिकेने पुलाचे काम पूर्ण केले आहे, असे मंगल प्रभात लोढा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray : महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून…; राज ठाकरेंचे मराठा समाजाला आवाहन

काय आहे प्रकरण?

दरम्यान, गोखले पूल धोकादायक झाल्याने 7 नोव्हेंबर 2022 रोजी वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वे व महापालिकेने समन्वय साधत 1 एप्रिल 2023 पासून गोखले पुलाचे काम सुरू केले. 25 फेब्रुवारी रोजी गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मात्र, गोखले पुलाच्या उंचीत दीड ते पावणेदोन मीटरने वाढ झाल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याचपार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महानगर पालिकेवर निशाणा साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -