घरमुंबईअंधेरीत पुलाचा लोखंडी रॉड निखळला, ५० लोकलची सेवा विस्कळीत

अंधेरीत पुलाचा लोखंडी रॉड निखळला, ५० लोकलची सेवा विस्कळीत

Subscribe

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी पुलाजवळ पाईपलाईन टाकण्यात आलेल्या पुलाचा लोखंडी रॉड अचानक निखळून लटकत असल्याचे वेळीच निदर्शनास आल्याने जलद मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात आला.

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी पुलाच्या अपघाताची घटना ताजी असतानाच याच पुलाजवळील पाईपलाइन जाण्यासाठी टाकलेल्या पुलाचा रॉड गंजून निसटल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. पण, ही घटना वेळीच निदर्शनास आल्याने गुरुवारी दुपारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. हा तुटलेला लोखंडी तुकडा हटविण्यासाठी पॉवर ब्लॉक घेतल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक दुपारी अर्धा तास विस्कळीत झाली.

वेळेवर निर्दशनाला आलं 

अंधेरी गोखले पुलाचा पादचारी मार्ग कोसळल्यामुळे या घटनेत एका महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. ३ जुलैला ही घटना घडली होती. याच पुलाजवळ पाईपलाईन टाकण्यात आलेल्या पुलाचा लोखंडी रॉड अचानक निखळून लटकत असल्याचे वेळीच निदर्शनास आल्याने जलद मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात आला. त्यासाठी अप आणि डाऊन जलद मार्गाची वाहतूक दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास थांबवण्यात आली.

- Advertisement -

५० गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं 

या गाड्या थांबवण्यात आल्यानंतर दुपारी १२.२५ ते १२.३६ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक घेऊन हा लटकणारा तुकडा हटवण्यात आला. या काळात अप जलद मार्गाची वाहतूक गोरेगाव तर डाऊन जलद मार्गाची वाहतूक सांताक्रुझपासून वळवण्यात आली. यामुळे एकूण १४ लोकल रखडल्या. शिवाय, ५० लोकलचं वेळापत्रक विस्कळीत होऊन प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र, वेळेवर ही बाब निर्दशनाला आल्यामुळं मोठी हानी होण्यापासून टळली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -