घरमुंबईमेट्रोसह इतर सार्वजनिक प्रकल्पासाठी १८०० झाडे तोडणार

मेट्रोसह इतर सार्वजनिक प्रकल्पासाठी १८०० झाडे तोडणार

Subscribe

ठाणे मुंबईकरांच्या हिताचा असणारा वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो ४ प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असला तरी सुध्दा मेट्रोसह ठाण्यातील सार्वजनिक प्रकल्पाच्या कामात सुमारे १ हजार ८७८ झाडे बाधित होणार आहेत.

ठाणे मुंबईकरांच्या हिताचा असणारा वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो ४ प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असला तरी सुध्दा मेट्रोसह ठाण्यातील सार्वजनिक प्रकल्पाच्या कामात सुमारे १ हजार ८७८ झाडे बाधित होणार आहेत. त्याबदल्यात केवळ १६४६ झाडांचे पूर्नरोपण केले जाणार आहेत. त्यातील १६० झाडे काढून टाकली जाणार असून, ७२ झाडे कापावी लागणार आहेत. मात्र २०१२ झाडांवरील स्थगिती न्यायालयाने कायम ठेवली आहे.

मेट्रो ४ प्रकल्पात ३ हजार ८८० झाडे बाधित

ठाणे महापालिकेच्या विविध विकास कामांमध्ये तसेच मेट्रो ४ प्रकल्पात असे एकूण ३ हजार ८८० झाडे बाधित होणार असल्याने त्या विरोधात ठाण्यातील पर्यावरण वादी रोहित जोशी आणि ठाणे नागरीक प्रतिष्ठान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामध्ये मेट्रो ४ प्रकल्पात सुमारे १०२१ तर ठाण्याच्या विविध विकास कामात ८५७ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे एकूग़्८७८ झाडे बाधित होणार असून यावरील स्थगिती न्यायालयाने उठवली आहे . ठाणे महापालिकेकडून डीपी रोड कामात कल्याण शीळ फाटा रस्त्यात ३७१ तर ऊर्जा प्रतिक ते नाशिक हायवे ८३ झाडे बाधित होत आहेत. ठाणे महापालिकेच्या कामांमध्ये सुमारे ६६८ झाडे बाधित होत आहेत. ठाणे जिल्हा कोर्टाच्या इमारतीच्या कामांसाठीही ९७ झाडे बाधित होणार आहेत. मेट्रोसह सर्व सावर्जनिक प्रकल्पांसाठी १८७८ झाडे बाधित होणार आहे तर खासगी प्रकल्पातील २०१२ वृक्षतोडीस न्यायालयाची स्थगिती कायम आहे.

- Advertisement -

प्राधिकरण               कामाचे नाव            ठिकाण                     बाधित झाडे            पुर्नरोपण

  • ठामपा                   डीपी रोड              कल्याण शीळ फाटा            ३७१                   ३२३
  • ठामपा                   डीपी रोड              ऊर्जा ते नाशिक हायवे             ८३                   ७४
  • ठामपा                   सिमेंट रोड             शिवाजी नगर रामबाग              ३७                   २७
  • एमएमआरडीए              मेट्रो ४             कापूरबावडी ते कासारवडवली     ४५८                  ४३५
  • एमएमआरडीए               मेट्रो ४             मुलूंड चेक नाका माजीवडा       ५०३                  ४७८
  • एमएमआरडीए          रोड रूंदीकरण           एरोली ते काटई नाका            ९२                   ७३
  • ठाणे जिल्हा कोर्ट       इमारत बांधकाम           ठाणे जिल्हा कोर्ट              १७७                  १६७

ठाण्यातील विविध विकास कामांमध्ये ३८८० झाडे बाधित होणार आहे त्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे त्यापैकी मेट्रोसह १८७८ झाडांवरील स्थगिती न्यायालयाने उठवली आहे उर्वरित २०१२ झाडांवरील स्थगिती कायम आहे.  –  रोहित जोशी; पर्यावरणवादी

- Advertisement -

हेही वाचा – कल्याण – डोंबिवली लोकल उद्या ५ तास बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -