घरमुंबईगांधीवादी निधी चौधरींची उपरोधिक पोस्ट जितेंद्र आव्हाडांना कळलीच नाही?

गांधीवादी निधी चौधरींची उपरोधिक पोस्ट जितेंद्र आव्हाडांना कळलीच नाही?

Subscribe

वादग्रस्त ट्विटवरुन गदारोळ झाल्यानंतर निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले. आज त्यांनी गांधीच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर अपलोड करत माझ्या ट्विटचा विपर्यास केला असल्याचे म्हटले आहे.

सनदी अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी एक वादग्रस्त ट्विट केले होते. गांधीना नोटेवरून काढा, पुतळे पाडा; गोडसेला थँक्यू बोलणार्‍या निधी चौधरींना निलंबित करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Nidhi Chaudhary tweet
निधी चौधरी यांचे ट्विट

निधी चौधरी यांनी १७ मे रोजी एक ट्विट केले होते. त्यात त्या म्हणतात की, “महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ३०-१-१९४८ साठी थँक्यू गोडसे.”

- Advertisement -

निधी चौधरींच्या या ट्विटवरून मोठा गदारोळ माजला. त्यानंतर निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले. आज त्यांनी गांधीच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर अपलोड करत माझ्या ट्विटचा विपर्यास केला असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा माफीनामा फेटाळून लावत संविधानाची शपथ घेऊन काम करणाऱ्या एका जबाबदार आयएएस अधिकार्‍याला ही भाषा शोभत नसल्याचे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या ट्विटची दखल घेत निधी चौधरी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

‘मी पक्की गांधीवादी आहे. सोशल मीडियावर गांधीविरोधामध्ये उलट सुलट पोस्ट केल्या जत असल्यामुळे मी दुःखी होऊन ही पोस्ट लिहिली आहे. २०१९ हे महात्मा गांधी यांचे १५० व्या जयंती वर्ष आहे. मी दुःखी झाले होते. त्यातून व्यथित होऊन मी हे ट्विट केले होते. पण त्याच्या अर्थाचा अनर्थ केला आहे. त्यांना हे ट्विट बरोबर वाचता आलेले नाही चुकीचा अर्थ लावून माझ्या पोस्ट विरोधात हे विधान केले आहे. त्यामुळे ती पोस्ट वाचावी म्हणजे मी ती पोस्ट का लिहिली आणि का लिहावी लागली याचा बोध होईल.’ – निधी चौधरी, उपयुक्त(विशेष), मुंबई महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -