घरCORONA UPDATECorona: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरी; बेस्टचे परिपत्रक जारी

Corona: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरी; बेस्टचे परिपत्रक जारी

Subscribe

कोरोनाच्या कालावधीत ड्युटीवर हजर राहणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. बेस्ट उपक्रमातील सेवेदरम्यान कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला नोकरी देण्याबाबतचे परिपत्रक बेस्ट उपक्रमामार्फत जारी करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मुंबई शहरासाठी सेवा देताना एक आधार देणारा आदेश बेस्ट उपक्रमामार्फत जारी करण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रमाच्या आदेशात नमूद केल्यानुसार ड्युटीवर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, भाऊ, अविवाहित बहिण यांना तत्काळ नोकरी देण्यात येईल, असे उपक्रमामार्फत जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्या कर्मचाऱ्याच्या नात्यातल्या एका व्यक्तीलाच ही संधी देण्यात येईल. ही नोकरी देताना कर्मचारी श्रेणी ३ किंवा श्रेणी ४ अनुसार शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर ही नोकरी देण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनामार्फत हा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

बेस्ट उपक्रमाकडून परिपत्रक जारी होणे हे बेस्ट वर्कर्स युनियनच्या प्रयत्नांना यश आले असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली आहे. पण आपण एवढ्यावरच थांबणार नसून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल, रूपये एक कोटी विमा सुरक्षा कवच आणि शहीद दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही राव यांनी सांगितले.

हेही वाचा –

कोरोनाच्या भीतीपोटी जिवंत प्राण्यांची बाजारपेठ बंद करण्याची गरज नाही – WHO

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -