घरताज्या घडामोडीकन्फर्म! काँग्रेसचं सरकार कोसळणार; आकडेमोड भाजपच्या बाजूने!

कन्फर्म! काँग्रेसचं सरकार कोसळणार; आकडेमोड भाजपच्या बाजूने!

Subscribe

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया भाजपची वाट पकडणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते; त्यांच्या सोबत गृहमंत्री अमित शहा ही होते.

मध्यप्रदेशमधील काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीमाना ज्योतिरादित्य सिंधियांनी दिल्यावर त्यांच्या गटातील १९ आमदारांनीही राज्यपालांकडे आपले राजीनामे सोपवले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशच्या काँग्रेस आमदारांच्या १२१ संख्याबळावरून थेट १११ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार हे अल्पमतात आले आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया भाजपची वाट पकडणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते; त्यांच्या सोबत गृहमंत्री अमित शहा ही होते. तसेच अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यसभेची उमेदवारी देवून केंद्रात मंत्रीपदाची ऑफर दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज सायंकाळी ते भाजपमध्ये प्रदेश करू शकतात.

ज्योतिरादित्य हे काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या निकटवर्तीय किंवा तरूण गटातले नेते म्हणून ओळखले जात होते. ज्योतिरादित्य सिंधियांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. १८ वर्षांनंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. राजीनामा देताना त्यांची एक प्रकारे काँग्रेस पक्षाबद्दलची नाराजी व्यक्त केल्याचे स्पष्ट होत आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाचे तीन गट आहेत. त्या गटामध्ये आपल्याला चांगली वागणूक दिली जात नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामु्ळे राजीनामा देऊन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या १९ आमदरांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. ते काँग्रेसच्या राज्यपालांकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता मध्यप्रदेशामध्ये कमलनाथ सरकार कोसळल्यात जमा आहे.

- Advertisement -

मध्यप्रदेशमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार?

मध्यप्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यापैकी ११४ आमदारांचे संख्याबळ असल्याने ११५ आमदारांचे संख्याबळ देवून काँग्रेसने बहुमत सिद्ध केले. काँग्रेसला ६ आमदारांचे समर्थन मिळाले, त्यामुळे काँग्रेस आघाडीची संख्या १२१ वर पोहोचली होती. त्यानंतर काँग्रेसने सरकार बनवले. तर भाजपकडे १०७ आमदार होते. भाजपाला सत्तास्थापनेसाठी ८ आमदार कमी पडत होते. त्यामुळे बाजपाला विरोधी पक्षात जावे लागले. राजीनाम्यानंतर काँग्रेसकडे १११ आमदार आहेत. एकंदरीत मध्यप्रदेशमध्ये भाजप आता आपली सत्ता स्थापन करण्याची भूमिका लवकरच घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

गद्दारांची हकालपट्टी करा…

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला हे फार बरे झाले, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली आहे. परंतु ज्योतिरादित्यांच्या राजीनाम्यानंतर मध्यप्रदेशातील काँग्रेसचे सरकार टिकणार नाही, असेही चौधरी यांनी मान्य केले आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर काँग्रेस पक्ष ट्रोल

ज्योतिरादित्य सिंधियांनी राजीमाना दिल्यानंतर सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात येत आहे. शिंदे तो झाँकी है, पायलट और देवरा अभी बाकी आहे, असे मेसेजही पाहायला मिळत आहेत. याशिवाय, ज्योतिरादित्य सिंधियांनी राजीमाना दिल्यानंतर आता राजस्थानचे उपमुख्यमंत्री काँग्रेसला रामराम ठोकणार का? असा चर्चा आता सोशल मीडियावर रंगविल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -